Join us
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्याला मुलतानी माती लावताना तुम्हीसुद्धा ‘ही’च चूक करताय, डॉक्टर सांगतात योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:48 IST

Skin Care : डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर आंचल यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला. त्यात त्यांनी मुलतानी माती चेहऱ्यावर लावण्याची योग्य पद्धत सांगितली आहे.

Skin Care : आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी महिला वेगवेगळे उपाय करत असतात. त्वचेची भरपूर काळजी घेतात. केवळ महिलाच नाही तर बरेच पुरूषही त्वचेची खूप काळजी घेतात. त्वचेसाठी बरेचजण मुलतानी माती लावतात. कारण त्वचा चमकदार आणि सतेज करण्यासाठी मुलतानी माती हा नॅचरल उपाय आहे आणि याचे काही साइड इफेक्ट्सही नसतात. पण याचा मुलतानी माती लावताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. 

प्रसिद्ध डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर आंचल यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला. त्यात त्यांनी मुलतानी माती चेहऱ्यावर लावण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. जेणेकरून त्वचेला याचे फायदे मिळतील.

डॉ. आंचल यांचा हा व्हिडीओ रिअ‍ॅक्शन व्हिडीओ आहे. ज्यात एक कुटुंबातील सगळ्याच सदस्यांनी चेहऱ्यावर मुलतानी माती लावली आहे. आणि ती तशीच चेहऱ्यावर ठेवून ते झोपत आहेत. यावर डॉक्टरांनी सांगितलं की, चेहऱ्यावर मुलतानी माती लावणं चांगलं असतं, पण आपल्याला ती लावण्याची योग्य पद्धत माहीत असली पाहिज. 

डॉक्टर सांगतात की, मुलतानी माती चेहऱ्यावर लावून कधीच झोपू नये. असं केल्यानं चेहऱ्यावरील नॅचरल ऑइल पूर्णपणे निघून जातं. ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसते. सोबतच चेहरा लालसरही दिसू शकतो. अशात या समस्या टाळण्यासाठी मुलतानी माती 80 टक्के सुकल्यावर धुवून काढावी. जर माती पूर्ण वाळेपर्यंत तशीच ठेवत असाल तर त्यासाठी चेहरा खूप घासावा लागेल. ज्यामुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं. जर आपली त्वचा ड्राय आणि संवेदनशील असेल तर या मातीचा वापर करू नये.

मुलतानी मातीचे फायदे

मुलतानी माती त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. याच्या मदतीनं चेहऱ्यावरील जास्तचं ऑइल आणि धूळ-मातीही साफ करता येते. तसेच  स्किन पोर्सही टाइट होतात. ज्यामुळे त्वचेचं तेज वाढतं आणि चेहरा उजळ दिसतो. इतकंच नाही तर ब्लॅकहेड्स, डागही दूर होऊ शकतात. सोबतच त्वचेला थंडावा आणि आराम मिळतो. 

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स