Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > कमी वयातच हातांवर सुरकुत्या येतात, हात कोरडे पडतात? पाहा कारणं आणि हात मुलायम करण्याचे सोपे उपाय

कमी वयातच हातांवर सुरकुत्या येतात, हात कोरडे पडतात? पाहा कारणं आणि हात मुलायम करण्याचे सोपे उपाय

Wrinkles On Hand : आपल्याला सुद्धा ही समस्या असेल तर हा लेख आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण हातांवरील सुरकुत्या घालवून त्वचा टाइट, ग्लासी आणि तरूण ठेवण्यासाठी काय करावं हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 12:21 IST2026-02-13T12:20:31+5:302026-02-13T12:21:54+5:30

Wrinkles On Hand : आपल्याला सुद्धा ही समस्या असेल तर हा लेख आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण हातांवरील सुरकुत्या घालवून त्वचा टाइट, ग्लासी आणि तरूण ठेवण्यासाठी काय करावं हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

Do your hands get wrinkles and dry at a young age? Know the simple solutions to make your hands soft | कमी वयातच हातांवर सुरकुत्या येतात, हात कोरडे पडतात? पाहा कारणं आणि हात मुलायम करण्याचे सोपे उपाय

कमी वयातच हातांवर सुरकुत्या येतात, हात कोरडे पडतात? पाहा कारणं आणि हात मुलायम करण्याचे सोपे उपाय

Wrinkles On Hand : जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत शेकहँड करतो तेव्हा आपले हात समोरच्या व्यक्तीवर एक वेगळा प्रभाव पाडतात. पण अनेकदा असंही होतं की, लोकांची नजर आपल्या हातावरील सुरकुत्यांवर पडते. अनेकदा तर असंही होतं की, आपण स्वत:च हातांवरील सुरकुत्यांमुळे किंवा कोरडेपणामुळे कुणाला शेकहँड करण्यास कचरतो. अनेकांबाबत असं होतं की, कमी वयातच हातांवर सुरकुत्या दिसू लागतात. असं तेव्हा होतं जेव्हा आपण हातांची योग्य ती काळजी घेत नाही. त्यामुळे हातांची त्वचा हळूहळू कोमेजलेली दिसू लागते. आपल्याला सुद्धा ही समस्या असेल तर हा लेख आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण हातांवरील सुरकुत्या घालवून त्वचा टाइट, ग्लासी आणि तरूण ठेवण्यासाठी काय करावं हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

हातांवर सुरकुत्यांची कारणं

हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, वाढत्या वयासोबत त्वचा सैल पडू लागते. पण जर कमी वयातच हातांवर सुरकुत्या दिसू लागल्या तर याची काही कारणं असू शकतात. जसे की, कोलेजनची कमतरता, ऊन्हात जास्त राहणे, हात पुन्हा पुन्हा धुणे, योग्य मॉइश्चरायजर किंवा लोशनचा वापर न करणे, सॅनिटायजरचा जास्त वापर करणे आणि पोषणाची कमतरता.

हातांवरील सुरकुत्या घालवण्याचे उपाय

जर आपल्याला हातांची त्वचा टाइट आणि सॉफ्ट करायची असेल तर आधी हात पुन्हा पुन्हा धुण्याची सवय कमी करा. कारण आपण ऑफिस, हॉटेल किंवा घरी ज्या हँड वॉशचा वापर करतो, ते आपली त्वचा कोरडी करतात. गरज असेल तेव्हा हात धुवा आणि हँड वॉश वापरल्यानंतर मॉइश्चरायजरचा वापर करा.

ग्लिसरीन आणि कोरफडीचा गर

ग्लिसरीनच्या मदतीने हँड क्रीम बनवण्यासाठी २ ते ३ चमचे कोरफडीचा गर घ्या आणि मग त्यात २ चमचे ग्लिसरीन घालून चांगलं मिक्स करा. त्यानंतर यात दोन चमचे दूध घालून ३ मिनिटं चांगलं मिक्स करा. हे क्रीम आपण कधीही आपल्या हातांवर लावू शकता. याने त्वचा मुलायम होईल आणि सुरकुत्याही कमी होतील.

शिया बटर

शिया बटरचा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये शिया बटर घ्या, त्यात थोडं खोबऱ्याचं तेल किंवा लँव्हेंडर एसेंशिअल ऑइल घालून मिक्स करा. २ ते ३ मिनिटं या गोष्टी चांगल्या मिक्स करा. नंतर हे मिश्रण एका एअरटाईट डब्यात ठेवा. हे मिश्रण आपण कधीही हातांवर लावू शकता. इतकंच नाही तर हे मिश्रण आपण चेहरा, ओठांवरही लावू शकता. याने त्वचा हेल्दी होते, मुलायम होते आणि सुरकुत्याही कमी होतात.

Web Title : कम उम्र में ही हाथों पर झुर्रियां? कारण और मुलायम हाथों के उपाय

Web Summary : कम उम्र में हाथों पर झुर्रियां कोलेजन की कमी, धूप या रूखेपन के कारण होती हैं। बार-बार हाथ धोना कम करें और मॉइस्चराइजर का उपयोग करें। मुलायम, जवां दिखने वाले हाथों के लिए ग्लिसरीन-एलोवेरा या शिया बटर का प्रयोग करें।

Web Title : Premature Hand Wrinkles? Reasons and Simple Remedies for Soft Hands

Web Summary : Early hand wrinkles are often due to collagen loss, sun exposure, or dryness. Reduce frequent hand washing and use moisturizers. Try glycerin-aloe vera or shea butter remedies for softer, younger-looking hands.