Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > २०२५ मध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला आणि गुगलवर सर्च केला गेलेला उपाय माहिती आहे का? त्वचा ठेवतो सुंदर

२०२५ मध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला आणि गुगलवर सर्च केला गेलेला उपाय माहिती आहे का? त्वचा ठेवतो सुंदर

Do you know the most popular and searched remedy on Google in 2025? this remedy Keeps skin beautiful : त्वचेसाठी फार उपयुक्त ठरतो हा उपाय. पाहा कोणता आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2025 10:29 IST2025-12-08T10:25:16+5:302025-12-08T10:29:35+5:30

Do you know the most popular and searched remedy on Google in 2025? this remedy Keeps skin beautiful : त्वचेसाठी फार उपयुक्त ठरतो हा उपाय. पाहा कोणता आहे.

Do you know the most popular and searched remedy on Google in 2025? this remedy Keeps skin beautiful | २०२५ मध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला आणि गुगलवर सर्च केला गेलेला उपाय माहिती आहे का? त्वचा ठेवतो सुंदर

२०२५ मध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला आणि गुगलवर सर्च केला गेलेला उपाय माहिती आहे का? त्वचा ठेवतो सुंदर

आजच्या जगात सौंदर्य आणि वेलनेस क्षेत्रात तंत्रज्ञानाची झेप विलक्षण झाली आहे. AI आधारित स्किन-अ‍ॅनालिसिस, स्मार्ट डिव्हायसेस आणि हाय-टेक उपचार हे ट्रेंडमध्ये असले तरी, या सर्व गॅझेट्सच्या गर्दीत एक अगदी साधा, परवडणारा आणि नैसर्गिक ट्रेंड जगभरात चमकून उठला तो म्हणजे Haldi Trend. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ट्रेंडने दाखवून दिले की सौंदर्याची खरी मजा कधी कधी सर्वात सोप्या रूटीनमध्येच दडलेली असते. (Do you know the most popular and searched remedy on Google in 2025? this remedy Keeps skin beautiful)परंपरेतून, विशेषतः भारतीय आयुर्वेदातून, जन्मलेल्या या ट्रेंडने जगभराला 'नैसर्गिक ग्लो'चे सौंदर्य पुन्हा जाणवून दिले.

हळद हा भारतीय स्वयंपाकघरातील रोजच्या वापराचा घटक. पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तो एका नव्या, आधुनिक रुपात आला. हळदीचे हलके पिवळे पाणी असलेल्या ग्लासेस, काचेच्या बॉटल्समध्ये चमकणारे हे पाणी दिसायला आकर्षक, aesthetic आणि मनाला शांत करणारे असे हे दृश्य लोकांना अतिशय भावले. टर्मरिक वॉटर ट्रेंड तर लोकांनी केलाच मात्र नंतर आणखी एका हळद पाण्याच्या टेंडने नॉन-AI फेनॉमेनन म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली. लोकांची पसंती पुन्हा हळूहळू नैसर्गिक उपायांकडे लागली आहे. हळदीचे पाणी यासाठी उत्तम उदाहरण ठरले. कोमट पाण्यात एक चिमूट हळद घालून दररोज सकाळी ते पिणे, फेस मिस्ट तयार करून त्वचेला हलका स्प्रे करणे, तर काहीजण किचन काउंटरवर aesthetic हळदीचे जार ठेवतात. या सर्वांमागे एकच कारण ते म्हणजे हळदीचे आयुर्वेदिक औषधी गुण.

यंदा हळदीशी संबंधित विविध ट्रेंड व्हायरल झाले. त्यामुळे गुगलवर २०२५ मध्ये सगळ्यात जास्त शोधला गेलेला ब्यूटी उपायही हळदीचे पाणी हाच ठरला. हे पाणी रोज पिणे आरोग्यासाठी फार फायद्याचे ठरते. हे तर आपल्याला लहानपणापासूनच माहिती आहे. असे उपाय आता कोणी करत नाही किंवा हे आऊटडेटेड आहे असे म्हणणारी तरुणपिढीही आता सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या ट्रेंडला फॉलो करत आहेत. भारताच्या बाहेरही टर्मरीक वॉटर प्रसिद्ध ठरला. गुगलने त्याची नोंद घेतली आणि २०२५ सर्वाधिक चाललेला उपाय ठरल्याचे सांगितले.   

Web Title : हल्दी का पानी: 2025 में गूगल पर खोजा गया सबसे लोकप्रिय सौंदर्य उपाय।

Web Summary : 2025 में, हल्दी का पानी सबसे लोकप्रिय सौंदर्य उपाय के रूप में उभरा, जिसके प्राकृतिक लाभ और वायरल सोशल मीडिया ट्रेंड थे। आयुर्वेद से उत्पन्न, इस सरल मिश्रण ने स्वस्थ, चमकती त्वचा को बढ़ावा देने के लिए वैश्विक मान्यता प्राप्त की। इसकी आसान उपलब्धता और सिद्ध औषधीय गुणों ने इसे पसंदीदा बना दिया।

Web Title : Turmeric water: Most popular beauty remedy searched on Google in 2025.

Web Summary : In 2025, turmeric water emerged as the top beauty remedy, driven by its natural benefits and viral social media trends. Originating from Ayurveda, this simple concoction gained global recognition for promoting healthy, glowing skin. Its easy accessibility and proven medicinal qualities made it a favorite.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.