Lokmat Sakhi >Beauty > काख-मांड्या काळवंडण्याचे कारण माहिती आहे का? पाहा काय उपाय करु शकता

काख-मांड्या काळवंडण्याचे कारण माहिती आहे का? पाहा काय उपाय करु शकता

Do you know the cause of dark armpits and thighs? See causes and remedies : घामामुळे त्वचा काळवंडते ? जाणून घ्या असे का होते. तसेच त्यावर काय उपाय करता येतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2025 13:53 IST2025-04-28T13:52:40+5:302025-04-28T13:53:59+5:30

Do you know the cause of dark armpits and thighs? See causes and remedies : घामामुळे त्वचा काळवंडते ? जाणून घ्या असे का होते. तसेच त्यावर काय उपाय करता येतील.

Do you know the cause of dark armpits and thighs? See causes and remedies | काख-मांड्या काळवंडण्याचे कारण माहिती आहे का? पाहा काय उपाय करु शकता

काख-मांड्या काळवंडण्याचे कारण माहिती आहे का? पाहा काय उपाय करु शकता

प्रत्येक ऋतूमध्ये त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. वातावरणातील बदलामुळे त्वचेला त्रास होतो. जळजळ होते, खाज सुटते. रॅश उठतात तसेच ऍलर्जी होऊ शकते. (Do you know the cause of dark armpits and thighs? See causes and remedies )उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घाम भरपूर येतो. शरीर ओले चिंब होऊन घामाचे ओघळ टपकत असतात. पंख्याखाली बसल्यावर किंवा मग एसीमध्ये बसल्यावर बरं वाटतं. मात्र पंख्याखाली बसल्यावर घाम गायब होतो कारण त्यातील बराचसा घाम शरीरात जिरतो. त्यामुळे वेगवेगळ्या ऍलर्जी होऊ शकतात. (Do you know the cause of dark armpits and thighs? See causes and remedies )फक्त घामच नाही इतरही काही कारणे असतात ज्यामुळे त्वचेला त्रास  होतो. 

शरीराचे असे काही भाग आहेत जेथे घाम साठून राहतो. काखेमध्ये घाम साठतो. त्यामुळे काखेला दुर्गंधी येते. तसेच खाज सुटते आणि काळवंडते. मांड्यांजवळही घाम फार साठतो. त्यामुळे खाज सुटते आणि मग लहान-लहान फोड सुद्धा उठतात. मांड्यांना रॅश उठले की चालणेही कठीण होऊन जाते. यावर अगदी सोपे काही उपाय आहेत ते नियमित करा. घाम येणे हे नैसर्गिक आहे ते थांबणे शक्य नाही. मात्र घामामुळे जास्त त्रास होऊ नये यासाठी काही घरगुती उपाय करा. 

१. डॉ. आंचल सांगतात, मांड्या तसेच काख काळवंडण्याचे कारण फक्त घाम नसतो. वजनामुळे हा त्रास होतो. वजन जास्त असणाऱ्या महिलांनाचा असे त्रास जास्त होतात. त्यामुळे वजन कमी करणे हा उत्तम उपाय आहे. त्यासाठी व्यायाम करा. अति घाम अति वजनामुळेच येतो. वजन कमी झाल्यावर घामही कमी येईल. 

२. छान दिसण्यासाठी महिला अनेक हेअर रिमूव्हर ट्रिटमेंट्स करत असतात. आयब्रोचं तसेच अप्पर लिप्सच थ्रेडींग करतात. चेहऱ्यावर केस काढण्यासाठी उपाय करतात. तसेच हाता पायाचे मांड्यांचे काखेतील केस काढण्यासाठीही ट्रिटमेंट करतात. त्यामध्येही काही पद्धती आहेत. ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन वॅक्सींग केले जाते तसेच घरी रेझर वापरला जातो. आजकाल हेअर रिमूव्हर स्प्रे मिळतात. या सगळ्या ट्रिटमेंट्समुळेही काख मांड्या काळवंडतात. एकदा डॉक्टरांशी बोलून जाणून घ्या की अशा ट्रिटमेंट तुमच्या त्वचेला त्रासदायक आहेत का नाही. कोणती पद्धत सुट होते. प्रत्येक त्वचेची ठेवण वेगळी असल्याने ट्रिटमेंटही वेगळी घ्यावी लागू शकते.

३. हळदीचा लेप लावणे हा उपाय फायदेशीर ठरतो. हळदीमुळे त्वचा उजळते. मात्र हळदीमध्ये अँण्टी बॅक्टेरियल गुणधर्मही असतात. ज्यामुळे त्वचेला काही ऍलर्जी होत नाही. घामाचा वासही येत नाही. त्वचेचा काळपटपणा कमी होतो.

Web Title: Do you know the cause of dark armpits and thighs? See causes and remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.