Lokmat Sakhi >Beauty > एकदा दंडावर हात फिरवून पाहा, पुरळ लागते का? न दिसणारी लहान पुरळ-बारीक फोडांवर खास उपाय

एकदा दंडावर हात फिरवून पाहा, पुरळ लागते का? न दिसणारी लहान पुरळ-बारीक फोडांवर खास उपाय

do you have rash and bumps on arms? Special remedy for invisible small rashes and tiny blisters : हातावरील फोडांवर काय उपाय करायला हवा? पाहा कशामुळे उठते रॅश.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2025 14:13 IST2025-06-17T14:12:24+5:302025-06-17T14:13:06+5:30

do you have rash and bumps on arms? Special remedy for invisible small rashes and tiny blisters : हातावरील फोडांवर काय उपाय करायला हवा? पाहा कशामुळे उठते रॅश.

do you have rash and bumps on arms? Special remedy for invisible small rashes and tiny blisters | एकदा दंडावर हात फिरवून पाहा, पुरळ लागते का? न दिसणारी लहान पुरळ-बारीक फोडांवर खास उपाय

एकदा दंडावर हात फिरवून पाहा, पुरळ लागते का? न दिसणारी लहान पुरळ-बारीक फोडांवर खास उपाय

त्वचा हा अगदी नाजूक ज्ञानेंद्रिय आहे. धूळ, माती, प्रदूषण, पाणी, हवामानातील बदल या सगळ्याचा पहिला परिणाम हा त्वचेवरच होतो. कोणता आजार झाला किंवा काही त्रास असेल तर त्वचेवर त्याचा लगेच परिणाम दिसून येतो. त्वचा काळवंडते. त्वचेवर डाग उठतात. (do you have rash and bumps on arms?  Special remedy for invisible small rashes and tiny blisters)त्वचा ताणली जाते. करपल्यासारखी दिसायला लागते. पिंपल्स असो वा मुरुम त्वचेवर सगळ्याचाच परिणाम होतो. मात्र फक्त चेहर्‍याची त्वचा नाही सगळ्याच अवयवांची त्वचा नाजूक असते. चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स पटकन दिसबन येतात. मात्र इतर अवयवांकडे दुर्लक्ष होते. चेहऱ्यासाठी अनेक उपाय आपण करतो तसेच बाकी त्वचाही चांगली राहावी यासाठी काळजी घेणे गरजेचेच आहे. 

बरेचदा दंडावर लहान- लहान फोड उठतात. लालसर रंगाचे असतात. तसेच पांढरेही असतात. त्यात पसही तयार होतो आणि रक्तही असते. हातावर असे फोड का उठतात आणि त्यावर काय उपाय करायला हवा हे जाणून घ्या. 

१. केराटोसिस पिलारिस ही एक सामान्य त्वचेची स्थिती आहे. हा प्रकार धोकादायक नाही. मात्र वेळीच काळजी घेतली नाही तर त्वचा सुरकुतलेली दिसायला लागते. हातावर लहान फोडांच्या गाठी तयार होतात. अगदी लहान असतात. हात फिरवल्यावर हाताला खरखर जाणवते. काही तर त्वचेच्या रंगाच्याच असतात त्यामुळे दिसून येत नाहीत. या फोडांवर खाज येत नाही. त्रासदायक नसतात मात्र त्यात घाण साठून राहते आणि त्यामुळे नंतर त्रास होऊ शकतो.

२. काही फोडांमध्ये रक्त साठून राहते. त्यामुळे ते लालसर दिसतात. फुटल्यावर त्यातून थोडे रक्त आणि पस बाहेर येतो. या फोडांमुळे मात्र फार खाज सुटते. नखांनी खाजवल्यावर तात्पुरते बरे वाटते. मात्र नखांमुळे त्या फोडांची संख्या आणखी वाढते. त्यामुळे असे फोड कधीच खाजवायचे नाहीत. 

उपाय अगदी साधे आणि घरगुतीच आहेत. अंघोळ करताना हाताला साबण नीट चोळायचा. तसे न केल्यामुळेही त्वचेला त्रास होतोच. हाताला मॉइश्चराईझर लावणे फार उपयुक्त ठरते. उन, पाणी, वारा यांमुळे जर फोड उठत असतील तर मॉइश्चराईझरचा वापर नक्कीच फायद्याचा ठरतो. (do you have rash and bumps on arms?  Special remedy for invisible small rashes and tiny blisters)बेसनाचे पीठ, हळद, चंदन, लिंबाचा पाला हे सगळे उपाय आपण चेहऱ्यासाठी करतो. त्यांचाच वापर करुन हातावरील फोड ही गायब करता येतात.  

Web Title: do you have rash and bumps on arms? Special remedy for invisible small rashes and tiny blisters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.