Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोज न चुकता करा ‘असा’ सोपा फेस मसाज; डार्क सर्कल्स, चेहऱ्यावरची सुज-थकवा होईल गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2026 14:11 IST

Do this simple face massage every day, dark circles, puffiness and tiredness on the face will disappear : फेस मसाज करा न चुकता. पाहा किती फायदेशीर आहे.

आजकाल ताणतणाव, अपुरी झोप, सतत मोबाइल स्क्रीनकडे पाहणे, चुकीची स्किन केअर यामुळे डार्क सर्कल्स, चेहर्‍यावर सुज, थकवा, कोरडेपणा असे अनेक प्रॉब्लेम वाढताना दिसतात. पार्लरला वेळ किंवा खर्च शक्य नसेल तरी घरी स्वत:हून नियमित केलेली फेस मसाज या समस्यांवर खूप प्रभावी ठरु शकते. (Do this simple face massage every day, dark circles, puffiness and tiredness on the face will disappear)योग्य पद्धतीने केलेली सेल्फ फेस मसाज रक्ताभिसरण सुधारते, त्वचेला पोषण मिळते आणि चेहरा ताजातवाना दिसू लागतो. सेल्फ फेस मसाज सुरु करण्याआधी चेहरा नीट स्वच्छ धुवून घ्या. थोडेसे तेल, अ‍ॅलोवेरा जेल किंवा मॉइश्चरायझर लावा म्हणजे हाताची बोटे चेहऱ्यावर सहज फिरतील आणि त्वचा ओढली जाणार नाही. मसाज नेहमी हलक्या हाताने आणि वरच्या दिशेने करणे महत्त्वाचे असते.

डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी डोळ्यांभोवती हलका मसाज खूप उपयुक्त ठरतो. बोटांनी डोळ्यांच्या खालच्या भागावर वरच्या दिशेने हलक्या बोटाने गोलाकार मसाज करा. वरच्या पापणीवर बाहेरुन आत अशा पद्धतीने हलक्या बटाने मसाज करा. दाब देऊ नका, कारण डोळ्यांभोवतीची त्वचा खूप नाजूक असते. रोज २-३ मिनिटे हा मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि डोळ्यांखालची काळी छटा हळूहळू कमी होण्यास मदत होते.

चेहर्‍यावरची सुज आणि थकवा कमी करण्यासाठी गाल आणि जबड्याचा मसाज उपयोगी ठरतो. हाताच्या मुठी आवळा आणि मुठीने गालांच्या खालच्या भागापासून कानाकडे वरच्या दिशेने मसाज करा. जबड्याच्या रेषेवरही याच पद्धतीने साज करा. यामुळे लिम्फॅटिक ड्रेनेज सुधारते, चेहर्‍यावरची सुज उतरते आणि चेहर्‍याचा शेप अधिक स्पष्ट दिसू लागतो.

कपाळावरच्या रेषा आणि तणाव कमी करण्यासाठीही मसाज फायदेशीर ठरतो. दोन्ही हातांच्या बोटांनी कपाळाच्या मध्यभागापासून कडेकडेने वरच्या दिशेला मसाज करा. कधी गोलाकार तर कधी सरळ रेषेत करा. हा मसाज मनालाही शांत करतो आणि कपाळावरच्या फाईन लाईन्स कमी होण्यास मदत करतो. नाकाभोवती आणि ओठांच्या आजूबाजूला असणाऱ्या रेषांसाठी स्माईल लाईन मसाज उपयुक्त ठरतो. नाकाच्या कडेकडून ओठांच्या कोपऱ्याकडे आणि तिथून वर गालाकडे हलक्या हाताने मसाज करा. यामुळे या भागातील कडकपणा कमी होतो आणि चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो येतो.

मान आणि हनुवटीची मसाज पण ती खूप महत्त्वाचा आहे. मानेला खालपासून वरच्या दिशेने हलक्या हाताने मसाज करा. हनुवटीखालील भागावर बोटांनी किंवा मुठीने वरच्या दिशेने मसाज करा. यामुळे डबल चिन कमी होण्यास मदत होते आणि चेहर्‍याच्या आकारात समतोल राहतो. दररोज १०-१५ मिनिटे हा सेल्फ फेस मसाज केल्यास त्वचेतील रक्तप्रवाह सुधारतो, डार्क सर्कल्स, सुज आणि थकवा कमी होतो तसेच त्वचा अधिक टवटवीत आणि उजळ दिसू लागते. मसाजसोबत पुरेशी झोप, पाणी पिण्याची सवय आणि संतुलित आहार यांची जोड दिल्यास परिणाम अधिक लवकर दिसून येतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Simple daily face massage banishes dark circles, puffiness, and fatigue.

Web Summary : Combat dark circles and fatigue with daily self-massage. Improve circulation, nourish skin, and reduce puffiness. Use oil/gel for smooth strokes, focusing on eyes, cheeks, forehead, and neck. Consistent massage, sleep, hydration, and diet enhance results.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीहेल्थ टिप्स