Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुरकुत्या, डाग घालवण्यासाठी मसूरच्या डाळीचा खास फेसमास्क, पाहा कसा कराल याचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 12:39 IST

Skin Care Tips : आपण घरीच एक होममेड फेसमास्क बनवून चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करू शकता. पाहुयात कसा तयार कराल फेसमास्क आणि कसे मिळतील त्याचे फायदे....

Skin Care Tips : तापता सूर्य, दिवसेंदिवस वाढता उकाडा यामुळे तब्येतीचं तर नुकसान होतंच होतं, सोबतच त्वचेचंही नुकसान होतं. उन्हामुळे, घामामुळे अनेकांची त्वचा काळवंडते. इतकंच नाही तर उन्हामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या देखील येऊ लागतात. म्हणजे कमी वयातच आपण म्हातारे दिसू लागता. पण चिंता करण्याची गरज नाही. कारण आपण घरीच एक होममेड फेसमास्क बनवून चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करू शकता. पाहुयात कसा तयार कराल फेसमास्क आणि कसे मिळतील त्याचे फायदे....

मसूरची डाळ

आयुर्वेदानुसार, मसूरच्या डाळीचा वापर केवळ खाण्यासाठीच नाही तर त्वचेची काळजी घेण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. मसूरची डाळ त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. या डाळी आपण फेस मास्क तयार करू शकता. याने चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येण्यास मदत मिळते. पाहुयात याचा कसा कराल वापर.

कसा बनवाल फेसमास्क? 

स्किन टॅनिंग आणि चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी मसूरची डाळ हलकी भाजा आणि नंतर तिची पावडर तयार करा. यात हळद, दूध आणि मुल्तानी माती घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. पेस्ट हलकी सुकल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. या फेस मास्कने चेहऱ्यावरील धूळ, माती, एक्स्ट्रा तेल सगळं निघून जाईल आणि चेहरा ग्लो करू लागेल.

जायफळ आणि केसर

जायफळ आणि केसरचा फेसमास्क वारूनही आपण चेहऱ्यावर ग्लो आणू शकता आणि सुरकुत्या दूर करू शकता. केसर आणि जायफळाचा फेसमास्क बनवण्यासाठी केसर दुधात भिजवा. त्यानंतर जायफळाची पूड तयार करा. त्यात थोडं बेसन आणि केसर घातलेलं दूध टाका. या फेसमास्कने डार्क सर्कल आणि पिगमेंटेशनची समस्या दूर होते. आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा हा फेसमास्क वापरू शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : Lentil face mask: Get rid of wrinkles and spots easily!

Web Summary : Fight summer skin woes with a homemade lentil face mask! This Ayurvedic remedy, combined with turmeric, milk, and Multani mitti, reduces tan, removes impurities, and adds natural glow. Nutmeg and saffron mask also helps reduce dark circles.
टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स