दिवाळीच्या (Diwali 2025) दिव्यांसारखं आपल्या चेहऱ्यावरही तेज आणि चमक असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. जगप्रसिद्ध सौंदर्यतज्ज्ञ शहनाज हुसैन (Shahnaz Husain) यांनी यासाठी काही साधे पण प्रभावी घरगुती उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे कोणत्याही महागड्या ब्युटी ट्रिटमेंटशिवाय तुमचा चेहरा तेजस्वी दिसू शकेल. (Shahnaz Husain Shares Home Beauty Secrets For Festive Glow)
त्वचेची सखोल स्वच्छता
दिवाळीपूर्वीची साफसफाई आणि वातावरणातील प्रदूषणामुळे त्वचेवर मळ आणि तेल जमा होते. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे.
कोरड्या त्वचेसाठी
क्रीम किंवा जेल-आधारित क्लींजिंग मिल्क वापरा. कापसाच्या बोळ्यावर गुलाबपाणी घेऊन चेहरा स्वच्छ करा. कोरडी त्वचा मॉइश्चराइझ ठेवण्यासाठी कोरफडीचा रस किंवा ग्लिसरीनमध्ये गुलाबपाणी मिसळून लावा.
तेलकट त्वचेसाठी-दिवसातून किमान तीन वेळा चेहरा धुवा. उत्तम प्रतीचा फेस वॉश वापरा. गुलाबपाण्यात कापूस बुडवून चेहरा पुसल्यास त्वचेला ताजेतवाने वाटते.
नैसर्गिक स्क्रबचा वापर
त्वचेवरील मृत पेशी काढून टाकल्याशिवाय चमक येत नाही. आठवड्यातून दोनदा नैसर्गिक स्क्रब वापरा. सुकलेली पुदिन्याची पाने हलकी वाटून घ्या आणि त्यात थोडे तीळ (हलके वाटलेले) आणि मध मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा, ५ मिनिटे तसेच ठेवून हळूवारपणे चोळून धुवा. यामुळे त्वचेतील रॅशेस दूर होतात. बदाम किंवा तांदळाचे पीठ दही आणि चिमूटभर हळदीमध्ये मिसळून स्क्रब केल्यास नैसर्गिक चमक येते.
फेस मास्क
स्क्रब केल्यानंतर चेहऱ्याचे खुले झालेले पोर्स बंद करण्यासाठी फेस मास्क आवश्यक आहे. १ चमचा ओट्स पावडर, १ चमचा बदामाची पावडर आणि २ मोठे चमचे संत्र्याचा रस एकत्र करून फेस पॅक तयार करा. हा पॅक ३० मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर धुवा. यामुळे चेहऱ्यावर चमक तर येतेच, त्वचा तरुण दिसण्यास मदत होते.
चेहरा चांगला दिसावा यासाठी हे करा?
चेहऱ्यावर थकवा दिसू नये यासाठी चांगली आणि पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते. दिवाळीच्या अगदी एक दिवस आधी कोणतंही नवीन ब्युटी प्रोडक्ट पापरू नका, कारण त्याची रिऍक्श झाल्यास चेहऱ्याची सुंदरता बिघडू शकते. अगदी ऐनवेळी ब्लॅकहेड्स काढण्याचा प्रयत्न करू नका, कारण यामुळे त्वचेवर लालसरपणा येऊ शकतो.