Diwali 2025 : दिवाळीत सगळेच भरपूर फटाके फोडतात. अशात फटाक्यांच्या प्रदूषणामुळे त्वचेचं किती नुकसान होतं हे सर्वांनाच माहीत आहे. त्यात दिवाळीच्या दिवसात तर हा त्रास आणखीनच जाणवतो. फटाक्यांमधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे त्वचेचं मोठं नुकसान होतं. या धुरामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या अॅलर्जी होण्याचा धोका अधिक असतो. अशावेळी दिवाळीतील प्रदूषणात त्वचेची काळजी कशी घ्यावी याच्या काही टिप्स खालीलप्रमाणे सांगता येतील.
कशी घ्याल त्वचेची काळजी
१) फटाक्यांमुळे आरोग्याशी संबंधित वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे तुम्ही फटाके फोडा अथवा नका फोडू त्याचा परिणाम तुमच्या कमी-जास्त प्रमाणात होतोच. अशावेळी योग्यची काळजी घेणे गरजेचे आहे. फटाके फोडतांना जर कुठे काही इजा झाली तर शरीराचा तो भाग थंड पाण्यात बुडवा, जोपर्यंत वेदना किंवा जळजळ कमी होत नाही तोपर्यंत तो भाग पाण्यातच ठेवा.
२) दिवाळीत थंडीही बऱ्यापैकी पडलेली असते अशावेळ तहान कमी लागते. पण पाणी कमी पिऊन चालणार नाही. फटाक्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रसायने वापरली जातात, त्यामुळे धुराने त्वचेचं नुकसान होतं. या धुरामुळे त्वचा रखरखीत होते.
३) त्वचा जळाली असेल तर ती जागा पाण्याने धुवा किंवा त्या जागेवर बर्फ लावा. जर जखम साधारण असेल तर त्यावर खोबऱ्याचं तेल किंवा कडूलिंबाचं तेल लावा. तसेच जळालेल्या भागावर मध किंवा कोरफडीचं जेलही लावू शकता.
४) उलन सिल्क कपड्यांमध्ये आग लवकर लागते. त्यामुळे फटाके फोडताना सुती कपड्यांचा वापर करा.
५) फटाके फोडल्यानंतर किंवा बाहेरून आल्यानंतर हात-पाय चांगले स्वच्छ करा. त्यासोबतच मॉइश्चरायझरचा वापर करा.
Web Summary : Firecracker pollution during Diwali damages skin, causing allergies and dryness. Drink water, wear cotton, treat burns with coconut oil or aloe vera, and moisturize after exposure.
Web Summary : दिवाली में पटाखों से प्रदूषण त्वचा को नुकसान पहुंचाता है, जिससे एलर्जी और रूखापन होता है। पानी पिएं, सूती कपड़े पहनें, नारियल तेल या एलोवेरा से जलन का इलाज करें और संपर्क के बाद मॉइस्चराइज़ करें।