Lokmat Sakhi >Beauty > शरीरातील सगळ्यात अस्वच्छ अवयव, ज्यात राहतात हजारो बॅक्टेरिया; इन्फेक्शनचा मोठा धोका

शरीरातील सगळ्यात अस्वच्छ अवयव, ज्यात राहतात हजारो बॅक्टेरिया; इन्फेक्शनचा मोठा धोका

Most unclean part in Body : सामान्यपणे लोक डोळे, चेहरा, बगल, केस यांच्या स्वच्छतेवर अधिक भर देतात. पण अशा एका अवयवाची स्वच्छता विसरतात जो शरीरातील सगळ्यात अस्वच्छ असतो.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 18:37 IST2025-04-02T15:04:54+5:302025-04-03T18:37:38+5:30

Most unclean part in Body : सामान्यपणे लोक डोळे, चेहरा, बगल, केस यांच्या स्वच्छतेवर अधिक भर देतात. पण अशा एका अवयवाची स्वच्छता विसरतात जो शरीरातील सगळ्यात अस्वच्छ असतो.  

Dirtiest part of body thousands bacteria lives inside hole says study | शरीरातील सगळ्यात अस्वच्छ अवयव, ज्यात राहतात हजारो बॅक्टेरिया; इन्फेक्शनचा मोठा धोका

शरीरातील सगळ्यात अस्वच्छ अवयव, ज्यात राहतात हजारो बॅक्टेरिया; इन्फेक्शनचा मोठा धोका

Most unclean part in Body : आपण सगळेच रोग वेगवेगळे आजार टाळण्यासाठी किंवा त्वचेवर होणारे इन्फेक्शन टाळण्यासाठी शरीराची स्वच्छता करतो, रोज आंघोळ करतो. पण असेही काही लोक आहेत जे रोज आंघोळ करत नाहीत, तसेच शरीराची स्वच्छता करत नाहीत. ज्यामुळे त्यांना वेगवेगळ्या समस्या होतात. मात्र, तरी सुद्धा रोज आंघोळ करणारे लोक एक चूक करतात. सामान्यपणे लोक डोळे, चेहरा, बगल, केस यांच्या स्वच्छतेवर अधिक भर देतात. पण अशा एका अवयवाची स्वच्छता विसरतात जो शरीरातील सगळ्यात अस्वच्छ असतो.  

साबण, शाम्पू, फिटकरी लावून शरीराची खूप स्वच्छता केल्यानंतरही असा भाग राहतो ज्याची पूर्णपणे स्वच्छता होत नाही. या भागामध्ये अब्जो बॅक्टेरिया राहतात आणि आपल्याला माहितही नसतं. 

नाभि सगळ्यात अस्वच्छ अवयव

2012 मध्ये पीएलओएस वनमध्ये प्रकाशित एका शोधानुसार, आपल्या नाभीमध्ये 2, 368 प्रकारचे बॅक्टेरिया असतात. यातील अनेक म्हणजे 1,458 प्रजाती वैज्ञानिकांसाठी नव्या आहेत. इथे सगळ्यात जास्त घाम येतो. नाभी स्वच्छ करणंही सोपं नसतं. कारण आत खड्डा असतो. त्यामुळे यातून दुर्गंधी येते आणि इथे बॅक्टेरिया वाढतात.

 नाभी मुळात शरीरावरील एक घाव आहे. हा घाव तेव्हा तयार होतो जेव्हा बाळ आपल्या आईपासून वेगळं होतं. नाभी सामान्यपणे आतल्या बाजूने खोल असते. 

काय करावा उपाय?

टोरांटोमध्ये डीएलके कॉस्मेटिक डर्मेटोलॉजी आणि लेजर क्लीनिकच्या त्वचा एक्सपर्टनुसार,  जर तुमचं वजन जास्त असेल, टाइप 2 डायबिटीस तर नाभी स्वच्छ करण्यासाठी वॉशक्लॉथचा वापर केला जाऊ शकतो. 

डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की, जर कधी नाभीमध्ये खाज आली, नाभी लाल झाली, वेदना होत असेल किंवा दुर्गंधी येत असेल तर वेळीच सावध व्हा. असं काही इन्फेक्शन झालं तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

एक्सपर्टनुसार, नाभीची स्वच्छता करण्यासाठी स्वच्छ कापडाचा वापर करा. कपडा गरम पाण्यात बुडवून आणि सोप वॉटरचा वापर करून नाभि स्वच्छ केली जाऊ शकते. 

Web Title: Dirtiest part of body thousands bacteria lives inside hole says study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.