Join us

चेहरा धुताना तुम्हीही ‘या’ चुका तर करत नाही ना? स्किन स्पेशालिस्ट सांगतात, चेहरा धुण्याची योग्य पद्धत..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 15:22 IST

Skin Care Mistakes: चेहरा धुताना अनेक महिला काही चुका करतात. याबाबत डर्मेटोलॉजिस्ट डॉ. गुरवीन वराइच यांनी माहिती दिली आहे.

Skin Care Mistakes: त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला वेगवेगळ्या गोष्टी करतात. पण अशाही अनेक महिला आहेत ज्या चेहऱ्याची काळजी घेताना काही चुका करतात. ज्यामुळे त्वचेचं नुकसान होतं. खासकरून चेहरा धुताना अनेक महिला काही चुका करतात. याबाबत डर्मेटोलॉजिस्ट डॉ. गुरवीन वराइच यांनी माहिती दिली आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून चेहरा धुताना केल्या जाणाऱ्या चुकांबाबत त्यांनी सांगितलं. 

चेहरा धुण्यासंबंधी चुका

डबल क्लेंजिंग करणं

डर्मेटोलॉजिस्ट म्हणाल्या की, सगळ्यांनीच डबल क्लेंजिंग करणं गरजेचं नाही. जर मेकअप लावलं असेल, धूळ-मातीतून आले असाल किंवा सनस्क्रीन लावलं असेल तर डबल क्लेंजिंग करायला हवं. पण जर तुम्ही घरात आहात, स्किन ड्राय असेल, मेकअप लावलं नसेल तर क्लेंजिंग करण्याची गरज नाही.

६० सेकंदाचा मेकअप रूल

चेहरा पूर्ण ६० सेकंद म्हणजे एक मिनिटांपर्यंत धुण्याचा असा काही फिक्स नियम नाही. चांगल्या क्लेंजरनं १५ ते २० मिनिटांपर्यंत चेहरा साफ करणं पुरेसं आहे.

कोणताही साबण वापरणं

डर्मेटोलॉजिस्ट सांगतात की, भारतात लोक जो साबण हाताला लागेल त्यानं चेहरा धुतात. पण हे चुकीचं आहे. क्लेंजर तुमच्या पीएच, अॅक्ने आणि स्किन बॅरिअरला अफेक्ट करतं. त्यामुळे एक चांगलं क्लेंजर निवडणं गरजेचं असतं.

मायसेलर वॉटर न धुणं

चेहरा स्वच्छ करताना केली जाणारी आणखी एक चूक म्हणजे मेकअप काढण्यासाठी वापरलं जाणारं मायसेलर वॉटर चेहऱ्यावर लावल्यानंतर ते धुवत नाहीत. अनेकांना वाटतं की, मायसेलर वॉटर धुण्याची गरज नाही. मायसेलर वॉटर चेहऱ्यावर तसंच लावून ठेवण्याचा अर्थ चेहऱ्यावर साबण लावून तसंच सोडून देणं. त्यामुळे मायसेलर वॉटर लावल्यावर चेहरा धुवायला हवा.

सनस्क्रीन आणि फेस वॉश 

जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा सनस्क्रीन लावता तेव्हा तुम्हाला चेहरा धुण्याची गरज नाही. जर तुम्ही बाहेर असाल आणि चेहऱ्यावर तेलाचा थर जमा झाला असेल तर चेहरा धुवायला हवा. त्याशिवाय जर तुम्ही स्किन ड्राय असेल तुम्ही चार भिंतीच्या आत आहात आणि स्किन साफ असेल तर सनस्क्रीन पुन्हा लावण्यासाठी चेहरा धुण्याची गरज नाही.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स