Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > ग्लोइंग स्किन- सिल्की केसांसाठी दीपिका पादुकोण रोज पिते 'हे' मॅजिक ज्यूस; ९० दिवसांत मिळेल सेलिब्रिटीसारखा लूक

ग्लोइंग स्किन- सिल्की केसांसाठी दीपिका पादुकोण रोज पिते 'हे' मॅजिक ज्यूस; ९० दिवसांत मिळेल सेलिब्रिटीसारखा लूक

Detox green juice for clear skin: Bollywood actress beauty diet tips: आपण सलग ९० दिवस या ज्यूसचे सेवन केले, तर आपली त्वचा सोन्यासारखी चमकेल आणि केसांचा पोतही सुधारेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2026 16:11 IST2026-04-10T16:10:19+5:302026-04-10T16:11:12+5:30

Detox green juice for clear skin: Bollywood actress beauty diet tips: आपण सलग ९० दिवस या ज्यूसचे सेवन केले, तर आपली त्वचा सोन्यासारखी चमकेल आणि केसांचा पोतही सुधारेल.

Deepika Padukone skin care routine ABC juice benefits for glowing skin Magic juice for hair growth and skin glow Deepika Padukone morning drink recipe How to get celebrity skin in 90 days | ग्लोइंग स्किन- सिल्की केसांसाठी दीपिका पादुकोण रोज पिते 'हे' मॅजिक ज्यूस; ९० दिवसांत मिळेल सेलिब्रिटीसारखा लूक

ग्लोइंग स्किन- सिल्की केसांसाठी दीपिका पादुकोण रोज पिते 'हे' मॅजिक ज्यूस; ९० दिवसांत मिळेल सेलिब्रिटीसारखा लूक

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही तिच्या अभिनयासोबतच सौंदर्यामुळे देखील ओळखली जाते. तिची चमकणारी त्वचा, घनदाट रेशमी केस हे अनेकांसाठी आकर्षणाचा केंद्र आहेत.(Deepika Padukone morning drink recipe) अनेकदा आपल्याला असं वाटतं की या सौंदर्यामागे महागड्या स्किन ट्रीटमेंट्स किंवा मेकअप असेल पण तिने तिच्या अनेक पॉडकास्ट किंवा मुलाखतीत सांगितलं की आपण काय खातो, आपला आहार कसा असावा हे देखील महत्त्वाचे आहे. ती बाह्य सौंदर्यापेक्षा आतील आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करते. (Deepika Padukone hair care tips)
दीपिका तिच्या दिवसाची सुरुवात एका खास मॅजिक ज्यूसने करते, जो नैसर्गिक घटकांपासून बनवलेला आहे. यात असणारे घटक शरीराला डिटॉक्स करत नाही, तर रक्तातील अशुद्धी दूर करुन त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो.(Natural glowing skin drink at home) जर आपण सलग ९० दिवस या ज्यूसचे सेवन केले, तर आपली त्वचा सोन्यासारखी चमकेल आणि केसांचा पोतही सुधारेल. 

२०२६ स्पेशल स्लिव्ह्ज डिझाइन, ब्लाऊजच्या ७ प्रकारच्या बाह्या दिसतात इतक्या सुंदर की रोज नेसावीशी वाटेल साडी

हा मॅजिक ज्यूस कसा बनवायचा? 

कोथिंबीर - अर्धी वाटी 
पुदीना - मूठभर 
कडुलिंबाची पाने - ४ ते ५ 
कढीपत्त्याची पाने - १० ते १२
बीट - अर्धा 

कृती 

सगळ्यात आधी सर्व पाने आणि बीट स्वच्छ धुवून घ्या. मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी घालून हे सर्व घटक बारीक वाटून घ्या. तयार झालेली पेस्ट मलमलच्या कापडाने किंवा गाळणीने गाळून घ्या. रोज सकाळी रिकाम्या पोटी हा ज्यूस पिणे सगळ्यात जास्त फायदेशीर ठरते. चवीसाठी यात थोडे लिंबू किंवा सैंधव मीठ टाकू शकता.

कोथिंबीर रक्तातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते, तर पुदीना पचनशक्ती सुधारते. कडुनिंब हे उत्तम ब्लड प्युरिफायर आहे. रक्तातील अशुद्धीमुळे होणारे त्वचेचे विकार दूर करण्यासाठी कडुनिंबाची ४-५ पाने या ज्यूसमध्ये टाकणे खूप फायदेशीर ठरते. केसांच्या आरोग्यासाठी कढीपत्ता फायदेशीर आहे. यात असलेले बीटा-कॅरोटीन आणि प्रथिने केस गळती रोखतात आणि केसांना मुळापासून मजबूत व रेशमी बनवतात. बीटमुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. यामुळे गालांवर नैसर्गिक गुलाबी छटा येते आणि चेहऱ्याचा काळपटपणा दूर होतो.

 

Web Title : ग्लोइंग त्वचा और रेशमी बालों के लिए दीपिका पादुकोण का सीक्रेट जूस।

Web Summary : दीपिका पादुकोण अपने दिन की शुरुआत प्राकृतिक तत्वों से बने एक खास जूस से करती हैं। यह जूस शरीर को डिटॉक्स करता है, खून को साफ करता है और त्वचा को प्राकृतिक चमक देता है। नियमित सेवन से 90 दिनों में चमकदार त्वचा और बेहतर बाल बनावट का वादा किया गया है।

Web Title : Deepika Padukone's secret juice for glowing skin and silky hair.

Web Summary : Deepika Padukone starts her day with a special juice made from natural ingredients. The juice detoxifies the body, purifies blood, and gives skin a natural glow. Regular consumption promises radiant skin and improved hair texture within 90 days.