Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओठांजवळची त्वचा निस्तेज आणि काळवंडलेली दिसते? मिळवा सुंदर त्वचा आणि दुखण्यापासून आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2026 16:28 IST

Dark skin around lips, pigmentation around mouth? try home remedies : ओठांजवळील डाग कमी करण्यासाठी सोपे उपाय.

ओठांजवळ काळे डाग दिसू लागले की चेहर्‍याचा तजेला कमी झाल्यासारखा वाटतो. अनेकांना वाटतं की हे फक्त धूळ किंवा टॅनिंगमुळे होत असावं. पण प्रत्यक्षात त्यामागे अनेक कारणं असू शकतात. (Dark skin around lips, pigmentation around mouth? try home remedies )त्वचेचा रंग बदलणे ही एक सामान्य समस्या आहे, मात्र योग्य काळजी घेतली तर ती नियंत्रणात आणता येऊ शकते.

ओठांजवळ काळे डाग का येतात?

सर्वात सामान्य कारण म्हणजे सूर्यप्रकाशाचा जास्त संपर्क. चेहर्‍यावर सतत ऊन पडल्यामुळे त्या भागातील त्वचेत मेलेनिनचे प्रमाण वाढते आणि त्वचा गडद दिसू लागते. हार्मोनल बदलही यासाठी कारणीभूत ठरू शकतात. विशेषतः महिलांमध्ये गर्भधारणा, पीसीओडी, किंवा हार्मोन्समध्ये होणारे चढउतार यामुळे त्वचेवर पिग्मेंटेशन दिसू शकते. जास्त प्रमाणात लिपस्टिक, लिप बाम किंवा कॉस्मेटिक उत्पादनांचा वापर आणि त्यातील रसायने यामुळेही ओठांभोवती काळसरपणा येऊ शकतो. काही वेळा चुकीच्या स्किन केअर उत्पादनांमुळे त्वचेची अॅलर्जी होऊन डाग पडतात. वारंवार ओठ चाटणे, सिगारेट ओढणे, शरीरात पाण्याची कमतरता, तसेच व्हिटॅमिन B12 किंवा आयर्नची कमतरता यामुळेही त्वचेचा रंग बदलू शकतो.

काय उपाय करावे?सर्वप्रथम, रोज घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ओठांभोवतीच्या भागावरही हलक्या हाताने सनस्क्रीन लावावे. त्वचा स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. दिवसातून दोनदा सौम्य फेसवॉशने चेहरा धुवावा. केमिकलयुक्त किंवा खूप हार्श उत्पादने वापरणे टाळावे. आठवड्यातून एकदा सौम्य स्क्रब केल्याने मृत त्वचा निघून जाते आणि त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. मात्र जास्त घासणे टाळावे.

घरगुती उपायांमध्ये बटाट्याचा रस, काकडीचा रस किंवा कोरफडीचा अर्क हलक्या हाताने लावल्यास त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होऊ शकते. लिंबाचा रस थेट लावणे टाळावे, तो त्वचेला त्रास देऊ शकतो. पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार घेणे आणि व्हिटॅमिन्सची कमतरता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घेणे फायदेशीर ठरते.

English
हिंदी सारांश
Web Title : Dark skin around lips? Get beautiful skin and relief.

Web Summary : Dark skin around the lips can be due to sun exposure, hormonal changes, or cosmetics. Use sunscreen, gentle cleansers, and mild scrubs. Home remedies like potato or cucumber juice may help. Stay hydrated and address vitamin deficiencies.
टॅग्स :ब्यूटी टिप्सहेल्थ टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी