डोळ्याखालचे डार्कसर्कल्स आजकालचा एक सामान्य समस्या झाली आहे. ही समस्या केवळ चेहर्याच्या सौंदर्याशी संबंधित नसून त्यामागे अनेक कारणे असतात. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे पुरेशी झोप न मिळणे. झोप कमी पडल्यामुळे डोळे तर सुजतातच मात्र त्याखालील त्वचेवरही परिणाम होतो. (Dark circles: See 3 ways to reduce dark circles, easy home remedies must try )शरीराला आवश्यक विश्रांती न मिळाल्यास त्वचेतील रक्ताभिसरण बिघडते आणि डोळ्यांभोवती काळपटपणा दिसू लागतो. ताणतणाव, जास्त वेळ मोबइल किंवा संगणक वापरणे, अनुवंशिक कारणे, पाण्याची कमतरता तसेच शरीरात लोहाची कमतरता असली तरी डार्कसर्कल्स तयार होऊ शकतात. वाढते वय हेही एक महत्त्वाचे कारण आहे. वयानुसार त्वचेतील कोलेजन कमी होते आणि त्वचा पातळ झाल्यामुळे डोळ्याखालील शिरा अधिक स्पष्ट दिसू लागतात.
डार्कसर्कल्स कमी करण्यासाठी जीवनशैलीत थोडेसे बदल करणे आवश्यक असते. सर्वप्रथम पुरेशी आणि चांगली झोप घेणे महत्त्वाचे आहे. रात्री सलग किमान सात ते आठ तास झोपल्यास डोळ्यांना विश्रांती मिळते. त्यामुळे सलग झोप महत्त्वाची. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे आणि लोहयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि त्वचेवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसतो. भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा तजेलदार राहते. संगणक अथवा मोबाईल वापरताना वेळोवेळी डोळ्यांना विश्रांती देणे आवश्यक आहे. डोळे स्वच्छ पाण्याने धुणे किंवा काकडी ठेवणेही उपयुक्त ठरते. ताणतणाव कमी करण्यासाठी उपाय करा. ताण कमी झाल्यावर ही समस्या नक्की कमी होईल.
१. बदामाचे तेल डोळ्यांना लावणे फायद्याचे ठरेल. डोळ्यांना थंडावा मिळतो आणि डोळ्याजवळील शिरा मोकळ्या होतात. झोपण्यापूर्वी बदाम तेलाने डोळ्यांना मालीश करा.
२. गुलाबपाणी लावणे किंवा कपूस गुलाबपाण्यात बुडवून डोळ्यावर ठेवणे फायद्याचे ठरते. हा उपाय नक्की उपयुक्त ठरेल. डोळ्यांना आराम देणे गरजेचे असते. जर डार्कसर्कल्स फारच वाढत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
३. थंड पाण्याची पिशवी वापरणे फायद्याचे ठरते. तसेच खोबरेल तेल लावणे हा ही चांगला उपाय आहे. कोरफडीचा गर लावल्याने डोळ्याला थंडावा मिळतो.