Dahi face packs : प्रत्येकाला वाटत असतं की, आपली त्वचा ग्लो करावी आणि आपण सुंदर दिसावं. यासाठी महिला किंवा तरूणी वेगवेगळे महागडे प्रॉडक्ट्स वापरतात किंवा मग पार्लरमध्ये जातात. पण आपल्या किचनमध्येच जर त्वचा ग्लो करण्याचा उपाय असेल तर...होय...दही हे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं. दह्याचा जर त्वचेवर नियमित वापर केला तर त्वचा हेल्दी होते, डाग दूर होतात आणि ग्लोइंगही दिसू लागते. अशात दह्याचा वापर कसा करावा हे जाणून घेऊयात.
दही आणि मुल्तानी माती
दह्यात मुल्तानी माती मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास कमी वयातच दिसणाऱ्या फाइन लाइन्स आणि सुरकुत्या कमी होतात. त्याशिवाय ओपन पोर्स कमी करण्यासही या मिश्रणाने मदत मिळते. स्किन टाइट करण्यासाठी दह्यात मुल्तानी माती मिक्स करून पेस्ट बनवा. ही चेहऱ्यावर ८ ते १० मिनिटांसाठी लावून ठेवा. चांगल्या परिणामासाठी हा उपाय आठवड्यातून दोनदा करा.
दही आणि मध
दही आणि मधाचा मास्क डेड स्किन दूर करण्यास आणि त्वचेवर ग्लो आणण्यास मदत करतो. हा मास्क बनवण्यासाठी २ चमचे दह्यात १ चमचा मध चांगलं मिक्स करा. आता चेहऱ्या धुतल्यानंतर हा मास्क लावा. नंतर हलक्या हाताने २ ते ३ मिनिटे मसाज करा. याने पोर्समधील मळ-माती निघून जाते. हा उपाय सुद्धा आठवड्यातून दोनदा करू शकता.
दही आणि पपई
दही आणि पपईचा फेस पॅक टॅन दूर करण्यास आणि स्किन टोन करण्यास मदत करतो. हा पॅक तयार करण्यासाठी २ चमचे दह्यात पपईचा गर मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर १० मिनिटे लावून ठेवा. नंतर चेहरा पाण्याने धुवा. हा उपाय सुद्धा आठवड्यातून दोनदा करू शकता.
Web Summary : Want glowing skin? Use yogurt! Mix it with Multani mitti for wrinkles, honey for dead skin, or papaya for tan removal. Simple kitchen remedies for a facial-like glow.
Web Summary : ग्लोइंग त्वचा चाहिए? दही का प्रयोग करें! झुर्रियों के लिए इसे मुल्तानी मिट्टी के साथ, डेड स्किन के लिए शहद के साथ या टैन हटाने के लिए पपीते के साथ मिलाएं। फेशियल जैसा निखार पाने के लिए आसान घरेलू उपाय।