Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्यावरील सुरकुत्या झटपट होतील दूर, लगेच ट्राय करा 'हा' कोथिंबिरीचा खास फेसपॅक; मग बघा कमाल

चेहऱ्यावरील सुरकुत्या झटपट होतील दूर, लगेच ट्राय करा 'हा' कोथिंबिरीचा खास फेसपॅक; मग बघा कमाल

Wrinkles Home Remedy : कोथिंबिरीत अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट, बीटा कॅरोटिन, व्हिटॅमिन सी आणि फोलेट असतात. जे त्वचेवरील केवळ फ्री रॅडिकल्सच दूर करत नाही तर त्वचा मुलायम आणि चमकदार करतात. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 14:44 IST2025-09-05T14:43:01+5:302025-09-05T14:44:16+5:30

Wrinkles Home Remedy : कोथिंबिरीत अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट, बीटा कॅरोटिन, व्हिटॅमिन सी आणि फोलेट असतात. जे त्वचेवरील केवळ फ्री रॅडिकल्सच दूर करत नाही तर त्वचा मुलायम आणि चमकदार करतात. 

Coriander face pack to get rid of wrinkles and oily skin | चेहऱ्यावरील सुरकुत्या झटपट होतील दूर, लगेच ट्राय करा 'हा' कोथिंबिरीचा खास फेसपॅक; मग बघा कमाल

चेहऱ्यावरील सुरकुत्या झटपट होतील दूर, लगेच ट्राय करा 'हा' कोथिंबिरीचा खास फेसपॅक; मग बघा कमाल

Wrinkles Home Remedy :  वेगवेगळ्या कारणांनी आजकाल कमी वयातच लोकांच्या चेहऱ्या सुरकुत्या पडून लोक म्हातारे दिसू लागले आहेत. अशात या सुरकुत्या दूर करण्यासाठी वेगवेगळे केमिकल प्रॉडक्ट्स वापरले जातात. पण यानेही नुकसान होण्याचा धोका असतो. अशात आज आपण सुरकुत्या दूर करणारा एक खास नॅचरल फेसपॅक पाहणार आहोत. 

कोथिंबिरीचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये, भाज्यांमध्ये वेगळ्या टेस्टसाठी जातो. मात्र, कोथिंबीर त्वचेच्या समस्या दूर करण्यासही फायदेशीर ठरते हे अनेकांना माहीत नसतं. कोथिंबिरीत अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट, बीटा कॅरोटिन, व्हिटॅमिन सी आणि फोलेट असतात. जे त्वचेवरील केवळ फ्री रॅडिकल्सच दूर करत नाही तर त्वचा मुलायम आणि चमकदार करतात. 

कोथिंबिरीमध्ये अ‍ॅंटी-फंगल प्रॉपर्टीज असतात जे कोणत्याही प्रकारच्या स्कीन इन्फेक्शनपासून बचाव करतातत. त्यासोबतच वाढत्या वयाचे त्वचेवर दिसणारे संकेतही दूर केले जातात. कोथिंबीर तेलकट त्वचेसाठीही फायदेशीर असते. याने त्वचेवरील अतिरिक्त ऑइल दूर केलं जातं. यामुळे त्वचेवर पिंपल्सही येत नाहीत.

सुरकुत्या आणि ऑयली त्वचेचा फेसपॅक

त्वचा ग्लोइंग आणि ऑइल फ्री करायची असेल तर कोथिंबिरीच्या पानांची पेस्ट तयार करा आणि त्यात अ‍ॅलोवेरा आणि लिंबाचा रस मिश्रित करा. अ‍ॅलोवेराचा जेल वापरण्याऐवजी अ‍ॅलोवेराचा पानांमघधील गर अधिक चांगला ठरेल. आता हे मिश्रण चांगल्याप्रकारे चेहऱ्यावर लावून अर्धा तास तसच राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. याने त्वचेवर केवळ चमकदारपणाच येणार नाही तर त्वचेवरील सुरकुत्याही दूर होतील.

डेड स्कीन  दूर करण्यासाठी फेसपॅक

कोथिंबीर तांदळाच्या पिठात मिश्रित करून चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो. हे कॉम्बिनेशन त्वचेसाठी एक्सफोलिएटर म्हणून काम करतं. १ कप कोथिंबिरीची पानं बारीक करा आणि २ चमचे तांदळाचं पीठ व एका लिंबाचा रस मिश्रित करा. हे मिश्रण चेहऱ्यावर अर्ध्या तासांसाठी लावून ठेवा नंतर चेहरा पाण्याने धुवावा.

Web Title: Coriander face pack to get rid of wrinkles and oily skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.