Join us

रडल्यानंतर चेहरा गार पाण्यानं धुण्याचं काय कारण? मानसिक आरोग्याशी आहे संबंध, मूड बदलतो तेव्हा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 16:36 IST

Cold Water Facial Benefits : एक्सपर्टनी सांगितलं की, थंड पाण्यानं चेहरा धुण्याचा मानसिक आरोग्याशी काय संबंध आहे आणि याचे काय फायदे होतात.

Cold Water Facial Benefits : मेकअप करण्याआधी महिला वेगवेगळ्या गोष्टी करतात. काही दिवसांआधी आलिया भट्टने (Alia Bhatt) मेकअप करण्याआधी थंड पाण्याने टिप्स करण्याच्या काही टिप्स दिल्या होत्या. ज्याची चांगलीच चर्चा झाली होती. पण ही केवळ एक मेकअप टिप्स नाही तर मानसिक आरोग्यासाठी रामबाण उपाय आहे. त्यामुळेच अनेकदा रडल्यानंतर थंड पाण्यानं चेहरा धुण्याचा सल्ला दिला जातो.

याबाबत हेल्थ कोच डिनाज वरवतवाला यांनी एका वेबसाइटला माहिती दिली. ते सांगतात की, थंड पाण्यानं चेहरा धुण्याचा मानसिक आरोग्याशी काय संबंध आहे आणि याचे काय फायदे होतात.

रडल्यावर शरीर सोडतं केमिकल्स

एक्सपर्ट सांगतात की, रडण्याकडे सामान्यपणे भावनात्मक रूपानं पाहिलं जातं. पण ही एक नॅचरल शारीरिक प्रक्रिया सुद्धा आहे. जेव्हा आपण रडतो, तेव्हा आपलं शरीर काही केमिकल्स सोडतं. यादरम्यान तणाव वाढवणारे कोर्टिसोल हार्मोन अधिक रिलीज होतात.

तणाव होतो दूर

एक्सपर्ट सांगतात की, जर अशावेळी आपण थंड पाण्यानं चेहरा धुतला तर तंत्रिका तंत्र म्हणजे आपलं नर्वस सिस्टीम शांत होतं आणि तणावा वाढवणाऱ्या हार्मोन्सचं प्रमाणही होतं. सोबतच मूड चांगला करणारे हार्मोन शरीरात अधिक वाढतात. त्यामुळे हेल्थ कोच सांगतात की, दिवसातून कमीत कमी एकदा थंड पाण्यानं चेहरा धुवावा.

काय काळजी घ्याल?

- जर आपल्याला सर्दी-खोकला असेल तर थंड पाण्यानं चेहरा धुणं टाळा.

- हिवाळ्यात थंड पाण्यानं चेहरा धुणं टाळा.

- काही सेकंदासाठी चेहरा थंड पाण्यात बुडवून ठेवा. जास्त वेळ असं करणं टाळा.

- जर आपली त्वचा जास्त संवेदनशील असेल तर थंड पाण्यात चेहरा जास्त वेळ ठेवा.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स