Coffee Benefits For Skin : कॉफी जगात सगळ्यात जास्त प्यायल्या जाणाऱ्या ड्रिंकपैकी एक आहे. जास्तीत जास्त लोक त्यांची दिवसाची सुरूवात सकाळी एक कप गरमागरम कॉफीने करतात. पण अनेकांना हे माहीत नसेल की, कॉफीने केवळ टेस्ट वाढते किंवा फ्रेश वाटतं असं नाही तर सौंदर्य खुलवण्यासाठीही कॉफी फायदेशीर ठरते. कॉफी त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. चेहऱ्यावर कॉफी लावल्याने अनेक फायदे मिळतात. कारण यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. चला जाणून घेऊ कॉफीने त्वचेला होणारे फायदे...
चेहऱ्यावर कॉफी लावण्याचे फायदे
१) डेड स्कीन होईल दूर
कॉफीमध्ये नॅचरल एक्सपोलिएंट गुण असतात. याचा वापर चेहऱ्यावरील मृत कोशिका दूर करण्यास केला जाऊ शकतो. याने चेहरा चमकदार दिसेल आणि उजळेल.
२) ब्लड सर्कुलेशन
कॉफीमध्ये कॅफीन असतं. जे ब्लड सर्कुलेशन उत्तेजित करतं. जेव्हा तुम्ही चेहऱ्यावर कॉफी लावता तेव्हा ब्लड फ्लो वाढतो. यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य आणखी खुलतं. चेहऱ्यावर पुरळही येत नाही.
३) सूज कमी होते
कॉफीमध्ये अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे त्वचेवरील सूज आणि लालसरपणा कमी करतात. जर तुमच्या चेहऱ्यावर सूज राहत असेल तर ती दूर करण्यास कॉफी फायदेशीर ठरते.
४) डार्क सर्कल
आजकाल डार्क सर्कलची समस्या खूप जास्त बघायला मिळते. कॉफीमधील कॅफीन डोळ्यांखाली आलेली सूज आणि डार्क सर्कल दूर करतं.
५) ग्लोइंग त्वचा
चेहऱ्यावर कॉफी लावल्याने त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत मिळते. याने चेहऱ्यावर ग्लो येतो.
६) सन डॅमेज
कॉफीमधील अॅंटी-ऑक्सिडेंट्स सूर्याच्या यूवी किरणांपासून होणाऱ्या नुकसानपासून बचाव करण्यास मदत करतात.
कशी वापराल कॉफी?
कॉफी आणि दूध
कॉफी चेहऱ्यावर लावण्याची एक चांगली पद्धत म्हणजे कॉफी आणि दुधाचा फेसपॅक तयार करा. यासाठी २ चमचे कॉफीमध्ये दूध मिक्स करून फेसपॅक बनवा. हा चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर पाण्याने चेहरा धुवून घ्या.
दही आणि कॉफी
चेहरा एक्सफोलिएट करण्यासाठी खासकरून कॉफी लावली जाते. यासाठी एक चमचा कॉफी पावडरमध्ये एक चमचा दही मिक्स करा. त्यात थोडी हळद टाका. ही पेस्ट चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर चेहरा धुवून घ्या. याने डेड स्कीन निघून जाईल आणि त्वचा स्वच्छ दिसेल.
मध आणि कॉफी
एक चमचा कॉफी पावडरमध्ये एक चमचा मध मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे लावून ठेवा. नंतर चेहरा धुवून घ्या. याने त्वचा मुलायम होईल आणि त्वचेवर ग्लो सुद्धा येईल. आठड्यातून एकदा हा उपाय करू शकता.