Lokmat Sakhi >Beauty > चेहरा खेचला गेलाय-काळपट वाटतो? नारळाच्या तेलात 'हा' पिवळा पदार्थ मिसळून लावा, चेहऱ्यावर येईल तेज

चेहरा खेचला गेलाय-काळपट वाटतो? नारळाच्या तेलात 'हा' पिवळा पदार्थ मिसळून लावा, चेहऱ्यावर येईल तेज

Coconut Oil And Turmeric For Glowing Skin : नारळाच्या तेलात लोरिक एसिड असते आणि या तेलातील एंटी मायक्रोबिअल गुण याचा उत्तम स्त्रोत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 16:48 IST2024-12-29T16:47:12+5:302024-12-29T16:48:26+5:30

Coconut Oil And Turmeric For Glowing Skin : नारळाच्या तेलात लोरिक एसिड असते आणि या तेलातील एंटी मायक्रोबिअल गुण याचा उत्तम स्त्रोत आहेत.

Coconut Oil And Turmeric For Glowing Skin : How To Use Coconut Oil For Hair Care | चेहरा खेचला गेलाय-काळपट वाटतो? नारळाच्या तेलात 'हा' पिवळा पदार्थ मिसळून लावा, चेहऱ्यावर येईल तेज

चेहरा खेचला गेलाय-काळपट वाटतो? नारळाच्या तेलात 'हा' पिवळा पदार्थ मिसळून लावा, चेहऱ्यावर येईल तेज

नारळाचे तेल खाण्यापिण्यासोबतच स्किन केअर आणि हेअर केअर उत्पादनांमध्ये वापरले जाते. या तेलात एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि त्वचेला मॉईश्चर मिळते. याव्यतिरिक्त नारळाच्या तेलात लोरिक एसिड असते आणि या तेलातील एंटी मायक्रोबिअल गुण याचा उत्तम स्त्रोत आहेत. (How To Use Coconut Oil For Hair Care)

जर तुमची त्वचा  ड्राय असेल तर नारळाचे तेल लावून तुम्ही त्वचेचा कोरडेपणा दूर करू शकता ज्यामुळे त्वचेवर उजळपणा येतो. हे तेल तुम्ही चेहऱ्यावर सहज लावू शकता.  यातील काही पदार्थ मिसळून चेहऱ्याला लावल्यास याचा परिणाम वाढते. नारळाचं तेल चेहऱ्याला कोणत्या पद्धतीनं लावावं यामुळे कोणते फायदे मिळतात समजून घेऊया. (Coconut Oil And Turmeric For Glowing Skin)

चेहऱ्यावर नारळाचं तेल कसं लावावं?

नारळाच्या तेलात व्हिटामीन ई चे गुणधर्म असतात. त्वचा कोरडी दिसत असेल तर नारळाचे तेल लावल्यानं तुम्ही चेहऱ्याची हरवलेली चमक परत आणू शकता. नारळाच्या तेलाचे २ थेंब हातावर घेऊन गळ्यावर आणि चेहऱ्यावर लावा. रात्रीच्या वेळी नारळाचं तेल चेहऱ्याला लावून झोपू शकता. ज्यामुळे त्वचा मॉईश्चराईज होते. तुम्ही अर्ध्या तासानं चेहरा धुवून झोपू शकता. 

नारळाचं तेल आणि हळद

ग्लोईंग त्वचेसाठी नारळाचं तेल हातावर घेऊन त्वचेवर लावा. हळद एंटी ऑक्सिडेंट्स, एंटी इंफ्लेमेटरी गुणांनी परीपूर्ण असते ज्यामुळे त्वचेला फायदे मिळतात. हातावर थोडं नारळाचं तेल घेऊन त्यात चुटकीभर हळद घाला. हे मिश्रण चेहऱ्याला लावून २० ते २५ मिनिटं तसंच ठेवा. त्यानंतर चेहरा धुवून घ्या ज्यामुळे त्वचा चमकदार दिसेल.

नारळाचं तेल आणि मध

कोरड्या त्वचेवर नारळाचं तेल आणि मध लावून ठेवू शकता. यासाठी योग्य प्रमाणात नारळाचं तेल आणि मध मिसळून मिक्स करा. नंतर हे मिश्रण चेहऱ्याला १० ते २० मिनिटं लावून ठेवा. चेहरा स्वच्छ धुवून घ्या. ज्यामुळे त्वचेचा ड्रायनेस दूर होईल आणि  चेहऱ्यावर चमक येईल. त्वचेचे मसल्स रिलॅक्स  होण्यासाठी नारळाचं तेल चेहऱ्याला लावू  शकता. ज्यामुळे ताण-तणाव कमी होईल आणि त्वचेला सुदींग इफेक्ट मिळेल.

मुलांनी आदरानं बोलावं असं वाटतं? आई वडीलांनी सुधारा या 5 सवयी; म्हातारपणातही आदर करतील मुलं

नारळाच्ये तेलात हेल्दी फॅटी एसिड्स असतात. जे मॉईश्चराईजरप्रमाणे काम करतात. हिवाळ्यात शुष्क हवेपासून त्वचेला वाचवण्यासाठी तुम्ही नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. नारळाच्या तेलाचा वापर करून मेकअप काढून टाकणंही सोपं आहे. ज्यासोबत त्वचेवर जमा झालेली घाण निघून जाण्यासही मदत होते. हे तेल एंटी एजिंग गुणांनी परीपूर्ण असते. सुरकुत्या  कमी करण्यासाठी चेहऱ्याला तुम्ही नारळाचं तेल लावू शकता. 

एंटी ऑक्सिडेंटसयुक्त गुणांनी परीपूर्ण नारळाचं तेल चेहऱ्याला लावल्यानं त्वचेचं होणारं नुकसान टाळता येतं.  फ्री रॅडिकल्सपासून त्वचा दूर राहते. आयलॅश किंवा आयब्रोचे केस वाढवण्यासाठीही तुम्ही नारळाचं तेल लावू शकता. ओठांना नारळाचं तेल लावल्यानं ओठ फाटण्याची समस्या उद्भवत नाही. नारळाचं तेल ओठांना मऊ बनवते..
 

Web Title: Coconut Oil And Turmeric For Glowing Skin : How To Use Coconut Oil For Hair Care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.