Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > वाढतं वय, त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी चित्रांगदा सिंग पिते कडूकडू ज्यूस! त्वचेवर येतो विशीतल्या तरुणीसारखा ग्लो...

वाढतं वय, त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी चित्रांगदा सिंग पिते कडूकडू ज्यूस! त्वचेवर येतो विशीतल्या तरुणीसारखा ग्लो...

Chitrangda Singh glowing skin secret : Chitrangda Singh skincare secret at 50 : anti ageing juice for wrinkle free skin : how to get glowing skin naturally at home : पन्नाशीतही त्वचेला चिरतरुण ठेवण्यासाठी चित्रांगदा सिंग दररोज पिते, 'नॅचरल अँटी-एजिंग ज्यूस' पाहा रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2026 16:10 IST2026-02-13T16:10:00+5:302026-02-13T16:10:01+5:30

Chitrangda Singh glowing skin secret : Chitrangda Singh skincare secret at 50 : anti ageing juice for wrinkle free skin : how to get glowing skin naturally at home : पन्नाशीतही त्वचेला चिरतरुण ठेवण्यासाठी चित्रांगदा सिंग दररोज पिते, 'नॅचरल अँटी-एजिंग ज्यूस' पाहा रेसिपी...

Chitrangda Singh glowing skin secret Chitrangda Singh skincare secret at 50 anti ageing juice for wrinkle free skin | वाढतं वय, त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी चित्रांगदा सिंग पिते कडूकडू ज्यूस! त्वचेवर येतो विशीतल्या तरुणीसारखा ग्लो...

वाढतं वय, त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी चित्रांगदा सिंग पिते कडूकडू ज्यूस! त्वचेवर येतो विशीतल्या तरुणीसारखा ग्लो...

वय वाढत गेलं की त्वचेवर सुरकुत्या, बारीक रेषा आणि निस्तेजपणा अगदी सहजपणे दिसू लागतो. परंतु याउलट काही बॉलिवूड अभिनेत्री वयाच्या पन्नाशीतही इतक्या तरुण आणि ग्लोइंग कशा दिसतात, असा प्रश्न आपल्यापैकी अनेकींना पडतो. बॉलिवूडमधील ग्लॅमरस आणि फिट अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिचं उदाहरण यासाठी अगदी योग्य ठरतं. वाढत्या वयातही तिची त्वचा ऐन विशीतल्या तरुणीसारखीच टवटवीत, चमकदार आणि एकही सुरकुती न दिसता अगदी सुंदर दिसते. चित्रांगदा सिंगच्या सौंदर्याची जादू काही औरच आहे. वयाची पन्नाशी जवळ आली तरी तिच्या चेहऱ्यावर ना थकवा दिसतो, ना वाढत्या वयाची एकही खूण. चित्रांगदाची त्वचा आजही तितकीच सुंदर आणि चमकदार आहे, जितकी तिच्या पहिल्या चित्रपटावेळी होती(Chitrangda Singh glowing skin secret).

वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्या आणि फाईन लाईन्स येणे सहाजिक आहे. तिथे चित्रांगदाची त्वचा वयाच्या पन्नाशीतही आरशासारखी नितळ आणि 'फ्लॉलेस' दिसते. अनेकदा चाहत्यांना प्रश्न पडतो की, तिच्या या चिरतरुण सौंदर्यामागे महागड्या ट्रिटमेंट्स आहेत की काही खास सिक्रेट ? नुकतेच चित्रांगदाने (Chitrangda Singh skincare secret at 50) तिच्या चाहत्यांशी एक खास सिक्रेट शेअर केलं आहे. तिचे सौंदर्य हे तिने स्वतःला लावलेल्या एका खास सवयीमुळे आहे. चित्रांगदाचा असा विश्वास आहे की, "तुम्ही जे खाता, तेच तुमच्या चेहऱ्यावर दिसतं!" आणि म्हणूनच, आपल्या त्वचेला चिरतरुण (how to get glowing skin naturally at home) ठेवण्यासाठी ती दररोज एक 'नॅचरल अँटी-एजिंग ज्यूस' न चुकता पिते. हा ज्यूस केवळ तिची त्वचा डिटॉक्स करत नाही, तर वयामुळे येणाऱ्या सुरकुत्यांनाही दूर ठेवतो. नैसर्गिक पद्धतीने कोलेजन वाढवणारा हा ज्यूस नेमका कोणता? तो घरी कसा तयार करायचा आणि हा ज्यूस त्वचेवर कशी जादू करतो? ते पाहूयात...

चित्रांगदा सिंग दररोज कोणता 'पॉवरफुल ज्यूस' पिते?

चित्रांगदा सिंगने 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या एका मुलाखतीत स्वतः सांगितले की, ती गेल्या अडीच वर्षांपासून रोज सकाळी रिकाम्या पोटी एक खास ज्यूस पीत आहे. ऐकायला हा ज्यूस थोडा विचित्र वाटू शकतो, पण याचे फायदे खरोखरच जबरदस्त आहेत. तिचे असे मानणे आहे की, या एका विशिष्ट सवयीमुळे  तिच्या आरोग्यात आणि फिटनेसमध्ये खूप चांगले बदल झाले आहेत. हा खास ज्यूस तीन पदार्थांपासून बनवला जातो. चित्रांगदा पिते तो हेल्दी ज्यूस (karela beetroot amla juice for skin) तयार करण्यासाठी आपल्याला, अर्धे कारले, १ बीटरुट आणि ५ आवळा इतक्या तीनच पदार्थांची गरज लागणार आहे. 

केसगळती होऊन टक्कल पडायच्या आधी लावा हे 'काळं तेल'! केसांच्या समस्यांवर एकच उपाय - वाढतील भराभर... 

डायबिटीस होईल किंवा शुगर वाढेल म्हणून उपाशी राहू नका, न्यूट्रिशनिस्ट सांगतात ५ सुपरफूड्स...

चित्रांगदा हा ज्यूस 'कोल्ड-प्रेस' पद्धतीने बनवते, जेणेकरून त्यातील सर्व फायबर आणि पोषक तत्वे पूर्णपणे सुरक्षित राहतील आणि तिचे शरीर ते सहजपणे शोषून घेऊ शकेल. तिच्या मते, हा ज्यूस केवळ त्वचेसाठीच नाही, तर संपूर्ण दिवस ऊर्जा आणि फिटनेस टिकवून ठेवण्यासाठीही मदत करतो. हा ज्यूस शरीर आतून स्वच्छ करण्यास, पचनास मदत करण्यास आणि नैसर्गिकरित्या त्वचेला तजेला देण्यास फायदेशीर ठरतो. हेच साधे, नैसर्गिक आणि हेल्दी रूटीन तिला बॉलिवूडची 'ग्लोइंग आणि फिट' अभिनेत्री बनवते. 

हा ज्यूस पिण्याचे फायदे काय आहेत?

चित्रांगदाने मुलाखतीमध्ये या ज्यूसपासून होणाऱ्या फायद्यांबद्दलही सांगितले आहे. तिच्या मते, हा ज्यूस शरीराच्या अंतर्गत भागावर काम करतो. यासोबतच शरीराला डिटॉक्स करण्यास मदत मिळते.

१. पचनसंस्था मजबूत होते.

२. त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात आणि नॅचरल ग्लो येतो.

३. दिवसभरात शरीर हलके आणि भरपूर ऊर्जा मिळून एनर्जेटिक वाटते.

तिचे असे म्हणणे आहे की, जर तुमचे पोट आणि शरीर आतून स्वच्छ असेल, तर त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर आपोआप दिसून येतो.

पोट साफ नसल्याने जॉ - लाईन, गालावर पिंपल्स येतात? सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट सांगतात उपाय - आरशासारखी त्वचा हवी तर..


पहिल्यांदा ज्यूस पिणार असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा...

चित्रांगदाने अशा लोकांसाठी एक सल्ला दिला आहे जे हा ज्यूस पहिल्यांदा पिण्याचा विचार करत आहेत. तिचे म्हणणे आहे की, जर तुम्ही पहिल्यांदा हा ज्यूस पीत असाल, तर प्रयत्न करा की त्यानंतर साधारण दोन तास तुम्ही घराबाहेर पडणार नाही. कारण सुरुवातीला हा ज्यूस शरीर लवकर साफ करतो, त्यामुळे वारंवार वॉशरूमला जावे लागू शकते. मात्र, काही काळानंतर शरीराला याची सवय होते आणि सर्वकाही सामान्य होते.

चित्रांगदाने मुलाखतीत स्किन आणि स्किन केअर ट्रीटमेंट्सबद्दलही तिचे मत मांडले. तिने सांगितले की खरी सुंदरता आतून येते. तिच्या मते, जर तुमची लाइफस्टाईल स्वच्छ आणि नीटनेटकी नसेल, तर केवळ फेशियल आणि क्रीम फारसा परिणाम करणार नाहीत. तिने स्पष्ट केले की चांगला संतुलित आहार घेणे, वेळेवर जेवणे, हिरव्या भाज्यांचा ज्यूस पिणे आणि शिस्त पाळणे अत्यंत गरजेचे आहे. या सवयी हळूहळू आपल्या लाईफस्टाईलचाच एक भाग बनून जातात.

Web Title : चित्रांगदा सिंह का राज: जवां त्वचा के लिए कड़वा जूस!

Web Summary : चित्रांगदा सिंह, पचास के करीब, करेला, चुकंदर और आंवला का जूस पीकर जवां त्वचा बनाए रखती हैं। यह प्राकृतिक एंटी-एजिंग जूस डिटॉक्स करता है, कोलेजन बढ़ाता है और झुर्रियों को दूर रखता है, जिससे समग्र स्वास्थ्य और चमकदार रंगत मिलती है, और जीवनशैली को श्रेय देती है।

Web Title : Chitrangada Singh's secret: Bitter juice for youthful, glowing skin.

Web Summary : Chitrangada Singh, nearing fifty, maintains youthful skin by drinking a daily juice of bitter gourd, beetroot, and amla. This natural anti-aging juice detoxifies, boosts collagen, and keeps wrinkles away, promoting overall health and a radiant complexion, crediting it to lifestyle choices.