चेहरा डागाळलेला दिसणे हा आजकाल अत्यंत सामान्य त्रास झाला आहे. स्वच्छ सुंदर एकही डाग नसलेला चेहरा अगदी मोजके दिवसच राहतो. प्रदूषण, ताण, हार्मोन्स, चुकीची जीवनशैली या सगळ्यांमुळे त्वचेचं नैसर्गिक संतुलन बिघडतं आणि चेहऱ्यावर काळे डाग, पिग्मेंटेशन, मुरुमांचे व्रण किंवा अनियमित रंग दिसू लागतो. आरशात दिसणारा निस्तेज, डागाळलेला चेहरा आत्मविश्वास कमी करतो.(Check in the mirror to see if your face looks blemished. Follow these 5 steps to prevent your face from looking dull) मग भरमसाठ मेकअपचा मार्ग मुली वापरतात. त्यामुळे चेहरा आणखी निस्तेज होतो या मागची कारणं ओळखली की त्यावर सहज उपायही करता येतात, तेही फार मोठी तयारी न करता.
चेहऱ्यावर डाग येण्यामागे पहिले कारण म्हणजे सूर्यकिरणांचा अति संपर्क. त्वचेला संरक्षण न दिल्यास उन्हात राहिल्यानंतर त्वचेतील मेलानिन वाढते आणि त्यातून तपकिरी डाग दिसतात. शिवाय मुरुमांनंतर राहणारे व्रण, हार्मोनल बदल, पिग्मेंटेशन, झोपेची कमतरता, चुकीची सौंदर्यप्रसाधने वापरणे, धूळ-धूर किंवा ताणही त्वचेला निस्तेज करतात. पाण्याची आणि पोषणाची कमतरता असेल तर त्वचा स्वतःचे पुनरुत्पादन नीट करू शकत नाही आणि डाग अधिक ठळक दिसतात.
१. एक साधा पण प्रभावी उपाय म्हणजे तांदळाच्या पाण्याचा वापर. भात धुतल्यावर मिळणारं पाणी फ्रीजमध्ये ठेवून दररोज कापसाने चेहऱ्यावर लावले तर त्वचेवरील पिग्मेंटेशन कमी होते आणि त्वचा मऊ होते. यात नैसर्गिक अँटी ऑक्सिडंट्स असतात जे डाग हलके करतात.
२.गुलाब पाण्याने चेहरा धुणे. चेहर्याला बेसन लावणे तसेच इतरही काही उपाय करणे फायद्याचे ठरते. फेसवॉश सौम्य आणि नैसर्गिक वापरा. विविध आयुर्वेदिक चूर्ण मिळतात. त्यांचा वापर करा. त्याचा फायदा जास्त होतो.
३. जर नैसर्गिक ब्राइटनिंग हवं असेल, तर आहारात फळांचे ज्यूस घ्या. बेसन आणि हळद दुधात मिसळून आठवड्यातून दोनदा चेहर्यावर लावावे. ऊसाचा रस प्या, त्यातील ग्लायकॉलिक अॅसिड माइल्ड एक्सफोलिएशन करते आणि त्वचेला तजेलदार ठेवते.
४. रोजच्या आयुष्यातील छोट्या सवयीही डाग कमी करण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर थंड पाणी लावल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि निस्तेजपणा कमी होतो. दिवसातून पुरेसं पाणी, फळं, आणि जीवनसत्त्व-सी असलेले पदार्थ खाल्ल्यास त्वचा आतून उजळते. बाहेर पडताना सनस्क्रीन वापरणे हा अत्यावश्यक नियमच समजावा.
५. चेहऱ्यावरील डाग एका दिवसात जात नाहीत, पण त्वचेची योग्य काळजी घेतली की ती स्वतःची चमक परत मिळवते. घरात सहज मिळणाऱ्या गोष्टी, नैसर्गिक उपाय आणि थोडं सातत्य यांच्या मदतीने डागाळलेला चेहरा पुन्हा एकदा टवटवीत, स्वच्छ आणि एकसारखा दिसू लागतो. त्वचेचं सौंदर्य म्हणजे तिची स्वच्छता. त्यामुळे चेहरा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.
