बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्यांच्या चेहऱ्यावरुन त्यांच्या वयाचा अंदाज बांधता येत नाही.(Skin care Tips) त्यांची शरीरयष्टी आणि व्यक्तीमत्त्वावरुन आपल्याला समजत देखील नाही.(bollywood skin care) वय वाढलं तरी त्यांचा फिटनेस, फिगर आणि चेहरा हा कायमच तरुण दिसतो. त्यातलीच एक मलायका अरोरा. (Celebrity skincare)मलायका अरोरा ही नेहमीच तिच्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे अनेकदा चर्चेत असते.(glowing skin secret) ५१ व्या वर्षी देखील तिची त्वचा कायम ग्लो आणि चमकदार पाहायला मिळते. वय वाढलं तरी तिचे सौंदर्य मात्र कमी झाले नाही. ती कायमच आपले फिटनेस रुटीन फॉलो करताना पाहायला मिळते. पण वाढत्या वयात तिची त्वचा ग्लो होताना दिसत आहे. (Makeup tips by Malaika Arora)
फक्त एक टोमॅटो घ्या-चेहऱ्यावरची लाली कमीच होणार नाही! अंघोळीपूर्वी चेहऱ्याला ‘असा’ लावा टोमॅटो
मलायका नेहमीच तिच्या फिटनेसबाबतचे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण यावेळी तिने स्किनकेअर रुटीन चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिचा प्री-मेकअप स्किनकेअर रुटीन दाखवला. ती म्हणते मेकअप करण्यापूर्वी आपली त्वचा अधिक चांगली असायला हवी. जर आपली त्वचा चमकदार करायची असेल तर काय करायला हवं याविषयी तिने स्टेप-बाय-स्टेप सांगितले. जर आपल्यालाही तिच्यासारखी वाढत्या वयात सुंदर दिसायचे असेल तर तिचे खास स्किन केअर रुटीन फॉलो करायला हवे.
मेकअप करण्यापूर्वी मलायका अरोरा चेहऱ्यावर लावते या गोष्टी
1. मलायका सगळ्यात आधी तिच्या चेहऱ्यावर हलके फेस ऑइल लावते. ती म्हणते की, त्वचेला चांगले हायड्रेट करण्यासाठी करते. नंतर ती रोलर चेहऱ्यावर सहज फिरतो. ज्यामुळे त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते.
2. ती गुआ शा टूल वापरते. हे टूल चेहऱ्यावरील सूज कमी करते. यामुळे वाढत्या वयातही त्वचा चमकदार दिसते. गुआ शा मसाज केल्यानंतर मलायका तिच्या डोळ्यांखाली पॅचेस लावते. ज्यामुळे डोळ्यांचा थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच सूजही कमी होते. डोळ्यांना लावलेल्या या पॅचेसमुळे काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते. यामुळे डोळ्यांखालची त्वचा उजळण्यास मदत होते.
3 . मलायका सांगते चेहऱ्या इतकाच मानेचा मसाजही महत्त्वाचा आहे. मेकअपपूर्वी हलक्या हाताने मानेचा मसाज करावा. ज्यामुळे चेहरा आणि मान दोघांना एकसारखी चमक येते.
4. सगळ्यात शेवटी ती ओठांवर लिप बाम लावते. ज्यामुळे ओठ मऊ होतात, आणि ज्यामुळे ओठांवर लिपस्टिक अधिक सुंदर दिसते. जर आपल्यालाही तिच्यासारखं सुंदर दिसायचं असेल तर मेकअप करण्यापूर्वी या सोप्या टिप्स नक्की फॉलो करुन फ्रेश लूक मिळवू शकता.