Join us

उपाशीपोटी कच्चा लसूण खाल्ल्यानं चेहऱ्यावरची पुरळ-ॲक्ने कमी होतात? व्हायरल चर्चा, पाहा तज्ज्ञ काय म्हणतात..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 15:18 IST

Is Garlic Beneficial to remove Acne : असं मानलं जातं की, रोज सकाळी जर उपाशीपोटी 2 ते 3 लसणाच्या कच्च्या कळ्या खाल्ल्या तर अ‍ॅक्नेची समस्या दूर होते. तसेच त्वचा साफ आणि चमकदार दिसते. पण खरंच कच्चा लसूण खाऊन त्वचेवरील अ‍ॅक्ने दूर होतात का?

Is Garlic Beneficial to remove Acne : चेहऱ्यावर अ‍ॅक्ने येणं ही एक फारच कॉमन समस्या आहे. अ‍ॅक्नेची समस्या कोणत्याही वयात होऊ शकते. काही लोकांचे अ‍ॅक्ने लगेच दूर होतात, पण काहींच्या चेहऱ्यावर हे जास्त दिवस राहतात. अशात अ‍ॅक्नेची समस्या दूर करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. काही लोक तर महागड्या ट्रीटमेंटही करतात. तर काही लोक अ‍ॅक्ने दूर करण्यासाठी घरगुती उपायांवर जास्त विश्वास ठेवतात. यातील एक घरगुती नॅचरल उपाय म्हणजे लसूण खाणं. असं मानलं जातं की, रोज सकाळी जर उपाशीपोटी 2 ते 3 लसणाच्या कच्च्या कळ्या खाल्ल्या तर अ‍ॅक्नेची समस्या दूर होते. तसेच त्वचा साफ आणि चमकदार दिसते. पण खरंच कच्चा लसूण खाऊन त्वचेवरील अ‍ॅक्ने दूर होतात का? असा प्रश्न अनेकांना पडतो. तेच आज एक्सपर्टकडून जाणून घेणार आहोत.

काय सांगतात एक्सपर्ट?

फेमस डर्मेटोलॉजिस्ट जुश्या भाटिया सरीन यांनी या उपायाबाबत त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत स्किन एक्सपर्टनी सांगितलं की, लसूण तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. पण लसूण खाल्ल्यानं अ‍ॅक्ने दूर होतात, या गोष्टीत पूर्णपणे सत्यता नाही. 

डॉ. सरीन यांच्यानुसार, लसणांमध्ये भरपूर प्रमाणात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे अ‍ॅक्नेसाठी कारणीभूत बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करू शकता. पण याचा प्रभाव फार स्लो असतो. म्हणजे केवळ लसूण खाऊन तुम्ही चेहऱ्यावर अ‍ॅक्ने दूर करू शकत नाहीत. तुम्ही तुमच्या आहारात लसणाचा समावेश करू शकता. पण यानं अ‍ॅक्ने दूर होण्याची प्रोसेस खूप स्लो आहे.

काय करावा उपाय?

याबाबत इन्स्टावर शेअर केलेल्या एका व्हिडिओत डर्मेटोलॉजिस्ट सांगतात की, अ‍ॅक्ने दूर करण्यासाठी सॅलिसिलिक अ‍ॅसिड एक प्रभावी उपाय आहे. हे बीटा-हायड्रॉक्सी अ‍ॅसिड त्वचेची आतपर्यंत स्वच्छता करतं. ज्यामुळे व्हाइटहेड्स आणि ब्लॅकहेड्सची समस्या दूर होते. सोबतच पिंपल्स आणि अ‍ॅक्नेही लगेच दूर होतात. अ‍ॅक्नेची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही 2 टक्के सॅलिसिलिक अ‍ॅसिड सीरमचा वापर करू शकता.

त्याशिवाय आजकाल बाजारात अनेक अ‍ॅक्ने पॅच सुद्धा मिळतात. हे ट्रान्सपेरंट टेपसारखे दिसणारे छोटे छोटे पॅच तुम्ही पिंपल्स आणि अ‍ॅक्नेवर लावू शकता. डॉक्टर सरीन यांच्यानुसार, या अ‍ॅक्ने पॅचमध्ये सॅलिसिलिक अ‍ॅसिड असतं, जे त्वचेला लवकर हील करतात.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स