सध्या गणेशोत्सव फार उत्साहात संपन्न झाला आहे. गणपती बाप्पाचे विसर्जन करून आपण त्यांना नुकताच निरोप दिला आहे. गणपती बाप्पा दहा दिवस घरात विराजमान झाल्यावर आपण मनोभावे त्याची पूजा करतो. गणपती बाप्पाची पूजा - आरती करताना (camphor for skin benefits) आपण काही वस्तूंचा वापर आवर्जून करतो. पूजेच्या (camphor and oil cream for glowing skin) थाळीत कापूर आणि विविध प्रकारच्या तेलाचा वापर केला जातो. बहुतेकदा आपण पूजेला लागणारे कापूर आणि तेल एकदम एकच वेळी आणून ठेवतो. काहीवेळा हे कापूर आणि तेल बऱ्याच प्रमाणांत शिल्लक रहाते. या शिल्लक राहिलेल्या कापूर वड्या ( natural homemade skin cream) आणि तेलाचा वापर कसा करावा असा प्रश्न पडतो( leftover camphor uses after Ganpati For Skin Care).
पूजेसाठी वापरला जाणारा कापूर आणि तेल आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरू शकते. अनेकदा गणपतीच्या पूजेमध्ये वापरले जाणारे कापूर आणि तेल तसेच उरते आणि आपण ते तसेच ठेवून देतो. पण या उरलेल्या कापूर आणि तेलाचा वापर करून आपण त्वचेसाठी एक खास घरगुती क्रीम तयार करू शकतो. ही घरगुती क्रीम आपल्या त्वचेच्या अनेक समस्यांसाठी गुणकारी व औषधी ठरते. पूजेसाठी वापरले जाणारे कापूर आणि तेल उरले तर, याची घरगुती अशी नैसर्गिक पद्धतीने स्किन केअर क्रीम तयार करु शकतो. ही घरगुती क्रिम, त्वचेला नैसर्गिक उजळपणा देते, पिंपल्स कमी करते आणि त्वचा मऊसर ठेवते. आपल्याकडे देखील बाप्पांच्या पूजेतील जास्तीच्या कापूर वड्या व तेल उरले असेल तर त्याची क्रीम कशी तयार करायची ते पाहूयात.
कापूर वड्या व तेल उरले असेल तर त्याची क्रीम कशी तयार करायची...
गणपती बाप्पांच्या पूजेतील साहित्य उरले असता, त्यापासून स्किनसाठी घरगुती नैसर्गिक पद्धतीने क्रिम कशी तयार करायची ते पाहूयात. क्रीम तयार करण्यासाठी आपल्याला २ ते ३ कापूर वड्या, बदामाचे तेल १ टेबलस्पून, खोबरेल तेल १ टेबलस्पून, एलोवेरा जेल २ टेबलस्पून, ग्लिसरीन २ टेबलस्पून, कस्तुरी हळद १/४ टेबलस्पून, चंदन पावडर १ टेबलस्पून, गुलाबपाणी १ टेबलस्पून इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
क्रीम कशी तयार करायची?
एका मोठ्या पसरट थाळीत, कापूर वड्यांची पावडर करून घ्यावी. त्यानंतर त्यात बदामाचे व खोबरेल तेल घालावे. आता चमच्याने कालवून या तेलात कापूर संपूर्णपणे विरघळवून घ्यावा.त्यानंतर या मिश्रणात एलोवेरा जेल, ग्लिसरीन, कस्तुरी हळद, चंदन पावडर, गुलाबपाणी असे सगळे घटक घालून मिश्रण कालवून एकजीव करुन घ्यावे. मग, चमच्याच्या मदतीने गोलाकार आकारात फिरवत हे मिश्रण फेटून घ्यावे. या मिश्रणाला थोडे क्रीम सारखे टेक्श्चर आले की तयार क्रीम एका काचेच्या छोट्या डबीत भरून स्टोअर करून ठेवावे.
दीपिका- कतरीनाची न्यूट्रिशनिस्ट सांगते केसांना करा पोटली मसाज! आजीबाईच्या बटव्यातील गुणकारी उपाय...
या घरगुती नैसर्गिक तयार क्रीमचा त्वचेसाठी वापर कसा करावा ?
सकाळ व संध्याकाळ अशा दोन्ही वेळा त्वचेवर हलक्या हातांनी हळूवार लावा किंवा फक्त पिगमेंटेशन, पिंपल्स असलेल्या भागांवर लावा. खरखरीत त्वचा, पुरळ किंवा कोरड्या भागावर दिवसातून दोनदा देखील लावू शकता.
प्या कपभर कडीपत्त्याच्या चहा! केसांची खुंटलेली वाढ, केसगळती होईल कमी - केस वाढतील भराभर...
ही क्रीम वापरण्याचे फायदे...
१. त्वचेवरील काळे डाग (पिगमेंटेशन) कमी होतात.
२. डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी करण्यास मदत करते.
३. त्वचेची लवचिकता वाढवून तिला अधिक ताजीतवानी करण्यास मदत करते.
४. चेहऱ्यावरील काळे डाग आणि सुरकुत्या कमी होतात.
५. उन्हामुळे काळवंडलेल्या त्वचेचे टॅनिंग कमी करण्यास मदत करते.
६. त्वचेला आतून स्वच्छ आणि निरोगी बनवते.
७. त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यास मदत करते.
८. चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यास उपयुक्त आहे.