Camphor and Coconut oil Benefits : सगळ्यांनाच असं वाटत असतं की, आपले केस लांब आणि मजबूत असावेत. त्यासाठी आपण वेगवेगळे उपायही करतो. पण अनेकदा हे उपाय फेल होतात. म्हणजे आपली मेहनतही वाया जाते आणि वेळही वाया जातो. अशात आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत, ज्यासाठी आपला वेळही वाया जाणार नाही आणि जास्त खर्चही लागणार नाही. हा सोपा आणि नॅचरल उपाय करून आपण लांब, काळे, चमकदार केस मिळवू शकता. आपल्याला माहीत आहेच की, केसांसाठी खोबऱ्याचं तेल किती फायदेशीर असतं. अशात जर यात कापूर मिक्स केला तर याचे फायदे दुप्पट वाढतात. तेच पाहुयात असं केल्यानं काय काय फायदे होतात.
सर्दी-खोकल्यास आराम
खोबऱ्याचं तेल आपल्या शरीराला उष्णता देतं आणि कापूर त्यातल्या थंडावा व सुगंधामुळे नाक आणि श्वसन मार्ग उघडतो. नाक बंद असल्यास किंवा हलक्या खोकल्यात हळूवार मालिश आराम देते.
संधिवात आणि स्नायूंच्या वेदना कमी होतात
कापूर आणि खोबऱ्याच्या तेलाचा उष्ण प्रभाव संधिवात, मणक्याच्या वेदना किंवा स्नायूंच्या दुखण्यावर आराम देण्यास मदत करतो. या मिक्स तेलानं हलकी मालिश केल्यास रक्तप्रवाह सुधारतो आणि वेदना कमी होतात.
त्वचेसाठी फायदा
कापरामध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात, त्यामुळे त्वचेवरील जळजळ, खाज किंवा लहान जखमा बऱ्या होऊ शकतात. तसेच खोबऱ्याचं तेल त्वचेला पोषण देतं आणि कोरडेपण कमी करतं.
तणाव कमी होतो
कापराचा सुगंध मानसिक तणाव कमी करतो आणि मन शांत करतो. यामुळे झोप न येणे किंवा हलक्या मानसिक तणावात हा उपयोगी ठरतो.
स्नायूंचा आराम
पाठी, छाती किंवा पायांवर लावल्यास स्नायू सैल होतात आणि थकवा कमी होतो. ज्यामुळे शरीराला आराम मिळतो.
कोंडा दूर होतो
कापरामध्ये अॅंटी-फंगल गुण असतात जे, डोक्याच्या त्वचेतील फंगस दूर करण्यास मदत करतात. तर खोबऱ्याचं तेल हे डोक्याच्या त्वचेतील कोरडपेणा दूर करतं. जर आपल्याला कोंड्याची समस्या असेल तर खोबऱ्याच्या तेलात कापूर मिक्स करून लावायला हवं.
उवांचा नायनाट
लहान मुलांच्या केसांमध्ये जर उवा झाल्या असतील तर यावर बेस्ट उपाय म्हणजे कापूर मिक्स केलेलं खोबऱ्याचं तेल. याच्या वासानं उवा मरतील. सोबतच यात असे अॅसिडिक गुण असतात ज्यामुळे उवा नष्ट होण्यास मदत मिळते.