Natural Face Pack : ऑक्टोबर महिना हा सणांचा महिना आहे. एकापाठी एक वेगवेगळे सण-उत्सव आहेत. अशात घराच्या स्वच्छतेसोबतच आपल्या शरीराच्या सौंदर्याकडे लक्ष देणंही गरजेचं असतं. दिवाळीची साफसफाई करून चेहरा चिमलेला, उतरलेला दिसतो. अशात पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशिअल करण्याऐवजी घरातीच काही नॅचरल गोष्टींच्या मदतीनं चेहरा सतेज करू शकता. असाच उपाय आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
बटाटे आणि बेसनाच्या फेसपॅकसाठी साहित्य
हळद
बटाटे
बेसन
मध
फेसपॅक बनवण्याची पद्धत
बटाटे बारीक करून त्यांचा रस काढा. बटाट्याचा रस काळा पडू नये म्हणून जरा घाई करावी लागेल. त्यात 2 चमचे बेसन घाला. चिमुटभर हळद घाला. नंतर एक चमचा मध टाका. चेहरा धुवून झाल्यावर हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटं तसाच राहू द्या आणि नंतर हलक्या हातानं मसाज करा. त्यानंतर ओल्या कापडानं चेहरा साफ करा आणि मग चेहरा पाण्यानं धुवा. त्वचा पूर्ण साफ दिसेल. सतत 8 दिवस हा उपाय केला तर चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो दिसेल. त्वचेचा कोरडेपणाही दूर होईल.
किती दिवस करावा उपाय?
बटाट्यामध्ये ब्लीचिंग तत्व असतात, ज्यामुळे चेहऱ्यावरील डाग-चट्टे दूर होण्यास मदत मिळते. त्यामुळे हा फेसपॅक 8 दिवस लावाल तर चेहऱ्याची रंगत वाढेल.