Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाकावर बारीक दाणे येतात? किचनमधला हा पदार्थ आठवड्यातून एकदा लावा, ब्लॅकहेड्स गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 14:49 IST

Blackheads Removal Tips : बाजारात अनेक उत्पादनं उपलब्ध असली तरी काही साधे आणि प्रभावी घरगुती उपाय  करून तुम्ही हे हट्टी ब्लॅकहेड्स हटवू शकता.

ब्लॅकहेड्स येणं ही त्वचेची एक सामान्य समस्या आहे. जी प्रामुख्यानं नाकावर, हनुवटीवर आणि कपाळावर दिसून येते. त्वचेच्या छिद्रांमध्ये तेल, मृत त्वचा आणि धूळ जमा झाल्यामुळे ते बंद होतात आणि हवेच्या संपर्कात आल्यावर ऑक्सिडाईज होऊन काळे पडतात. बाजारात अनेक उत्पादनं उपलब्ध असली तरी काही साधे आणि प्रभावी घरगुती उपाय  करून तुम्ही हे हट्टी ब्लॅकहेड्स हटवू शकता. ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळण्यास मदत होते. (Easy Ways To Remove Blackheads And Whiteheads From Nose)

बेकिंग सोडा

यासाठीचा एक प्रभावी उपाय म्हणजे बेकींग सोडा .बेकिंग सोड्यामध्ये सौम्य एक्सफोलिएटिंग गुणधर्म असतात. एक चमचा बेकिंग सोडा आणि पाणी सम प्रमाणात मिसळून त्याची पेस्ट तयार करा ही पेस्ट ब्लॅकहेड्स असलेल्या भागावर लावा. ज्यामुळे त्वचेची छिद्र उघडण्यास मदत होते आणि साचलेली घाण बाहेर पडण्यासही मदत होते.

ओटमील आणि दही

यातील ओटमील आणि दही यांचा मास्क देखील खूप गुणकारी ठरतो. ओटमील एक नैसर्गिक स्क्रब म्हणून काम करते. तर दही त्वचेला मऊ बनवते. हे दोन्ही घटक सम प्रमाणात मिसळून तयार केलेला पॅक चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटं ठेवा. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स टाळणयासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चेहऱ्याची नियमित स्वच्छता करणं, रोज २ वेळा चेहरा धुणं, आठवड्यातून एकदा वाफ घेणं हे ब्लॅकहेड्स काढण्यासाठी आणि त्वचेला नितळ बनवण्यासाठी मदत करतात.

लिंबू आणि मध

दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे लिंबू आणि मध यांचा वापर. लिंबू आणि मध यांचा वापर देखिल उपयुक्त ठरतो. लिंबामध्ये असलेले नैसर्गिक सायट्रिक एसिड त्वचेला स्वच्छ करते तर एंटी बॅक्टेरिअल घटकसुद्धा गुणकारी ठरतात. एक चमचा मधात लिंबाच्या रसााचे काही थेंब मिसळून ते मिश्रण ब्लॅकहेड्सवर लावा आणि १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. लिंबामध्ये नैसर्गिक सायट्रिक एसिड असते.

जे त्वचेसाठी उत्तम क्लिन्झरचे काम करते. तर मधात एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी इन्फ्लेमेटरी गुण असतात. एक चमचा मधात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळून ते मिश्रण ब्लॅकहेड्सवर लावा आणि कोरडे झाल्यावर १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. यामुळे त्वचा स्वच्छच होत नाही तर मऊ आणि चमकदारही होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Get rid of blackheads with this kitchen ingredient once a week.

Web Summary : Blackheads are a common skin problem. Baking soda, oatmeal-yogurt mask, or lemon-honey mix can help remove them. Regular face washing and steaming also help.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी