आरशात चेहरा पाहताना नाक, गाल किंवा हनुवटीवर दिसणारे छोटे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स आपला संपूर्ण लूकच बिघडवतात. चेहऱ्यावर जमा होणारे जास्तीचे तेल, धूळ, डेड स्किन आणि बंद झालेले पोअर्स यामुळे हे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स तयार होतात. कितीही महागड्या क्रीम लावल्या किंवा पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप केले, तरी काही दिवसांनी नाक आणि हनुवटीवर तेच हट्टी ब्लॅकहेड्स पुन्हा डोकं वर काढतात. विशेषतः ऑइली स्किन असणाऱ्यांना ही समस्या जास्त जाणवते. अनेकजण हे घालवण्यासाठी महागडी स्किन ट्रीटमेंट्स किंवा फॅन्सी स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरतात, मात्र काहीवेळा त्याचा त्वचेवर दुष्परिणामही होऊ शकतो. अशावेळी काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. योग्य स्किन केअर रुटीन आणि काही सोपे उपाय नियमितपणे केल्यास ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स कमी करण्यास मदत मिळू शकते(homemade mask for blackhead & whiteheads removal).
खरंतरं, त्वचेवरील ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सचे प्रमाण कमी करण्यासाठी, फक्त बाहेरून स्क्रब करणेच पुरेसे नसते तर त्यासाठी त्वचेची खोलवर स्वच्छता होणे गरजेचे असते. जर आपल्याला नाक, गाल आणि हनुवटीचा भाग पुन्हा एकदा मऊ आणि पहिल्यासारखा नितळ हवा असेल तर एक घरगुती उपाय असरदार ठरतो. त्वचेला (blackheads and whiteheads removal homemade natural mask) इजा न पोहोचवता, नैसर्गिकरीत्या हे काळे-पांढरे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स कसे काढून टाकायचे याचा सोपा घरगुती उपाय पाहा.
ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स काढून टाकण्याचा घरगुती उपाय...
नाक, गाल किंवा हनुवटीच्या भागात दिसणारे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स काढून टाकण्यासाठी घरगुती मास्क तयार करण्यासाठी घरातील उपलब्ध साहित्याचा वापर करु शकतो. हा मास्क तयार करण्यासाठी आपल्याला २ टेबलस्पून साखर, २ टेबलस्पून पाणी, १ टेबलस्पून कॉफी पावडर, १ टेबलस्पून लिंबाचा रस, १ टेबलस्पून खोबरेल तेल, १ टेबलस्पून मसूर डाळीची पावडर इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
घराचा कोपरा- उशी-चादरी सर्वत्र केस दिसतात? मेथ्या-भात-खाबरेल तेलाचा ‘हा’ उपाय आजच करा, लगेच...
नेमका घरगुती उपाय काय आहे ?
एका पॅनमध्ये साखर घालून ती मंद आचेवर व्यवस्थित विरघळवून घ्यावी. यात गरजेनुसार थोडं पाणी घालून साखर कॅरॅमलाईज करून घ्यावी. तयार साखरेचा पाक एका बाऊलमध्ये काढून त्यात कॉफी पावडर, लिंबाचा रस, खोबरेल तेल, मसूर डाळीची पावडर घालावी. आता हे सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्हल मास्क वापरण्यासाठी तयार आहे.
हा मास्क कसा वापरायचा ?
तयार मास्क बोटांच्या किंवा ब्रशच्या मदतीने ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सच्या भागात लावून हलकेच दाब देत मसाज करून घ्यावा. ३ ते ४ मिनिटे बोटांच्या मदतीने हलकेच चोळून मसाज करावा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे.
घाम साचून काळे झालेत अंडरआर्म्स? ५ मिनिटांचे २ उपाय - मी त्वचा दिसेल उजळ...
हा मास्क वापरण्याचे फायदे...
१. साखर :- साखर एक उत्तम नॅचरल एक्सफोलिएटर म्हणून काम करते. साखरेचे बारीक कण त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा मऊ आणि गुळगुळीत होते.
२. लिंबाचा रस :- लिंबाच्या रसामध्ये नॅचरल ब्लीचिंग एजंट आणि व्हिटॅमिन-सी असते. हे त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रित करते आणि ब्लॅकहेड्स निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांना रोखण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचेचा रंग उजळतो.
३. कॉफी पावडर :- कॉफीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे त्वचेला इन्स्टंट ग्लो देते आणि त्यातील खडबडीतपणामुळे त्वचेची छिद्रे खोलवर स्वच्छ होतात, ज्यामुळे ब्लॅकहेड्स काढणे सोपे जाते.
४. मसूर डाळीची पावडर :- मसूर डाळ त्वचेसाठी क्लिंजरसारखी काम करते. ही पावडर त्वचेतील घाण शोषून घेते आणि ब्लॅकहेड्स-व्हाईटहेड्समुळे होणारा काळपटपणा दूर करून त्वचा नितळ बनवते.
५. खोबरेल तेल :- मसाज करताना त्वचेला इजा होऊ नये म्हणून खोबरेल तेल वंगणासारखे काम करते. हे त्वचेला हायड्रेट ठेवते आणि बॅक्टेरियापासून संरक्षण करून त्वचेला नैसर्गिक ओलावा देते.
Web Summary : Blackheads and whiteheads mar your appearance. This article suggests a homemade mask using sugar, lemon, coffee, lentil flour, and coconut oil to remove them. The mask exfoliates, controls oil, and cleanses pores for clear skin. Use for 3-4 minutes, then rinse.
Web Summary : ब्लैकहेड्स और व्हाइटहेड्स आपकी सुंदरता को खराब करते हैं। इस लेख में चीनी, नींबू, कॉफी, मसूर दाल का आटा और नारियल तेल का उपयोग करके उन्हें हटाने के लिए एक घरेलू मास्क का सुझाव दिया गया है। यह मास्क एक्सफोलिएट करता है, तेल को नियंत्रित करता है और साफ त्वचा के लिए छिद्रों को साफ करता है। 3-4 मिनट के लिए उपयोग करें, फिर धो लें।