सध्याच्या बदलत्या लाईफस्टाईलमध्ये केसांच्या संबंधित समस्या उद्भवणं खूपच कॉमन झालं आहे. कमी वयातच लोकांना केस पांढरे होणं, केस गळणं अशा समस्या उद्वत आहे. बाजरात बायोटीन सप्लिमेंट्स आणि बायोटीन शॅम्पूंची मागणी वाढली आहे कारण यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते असा दावा केला जात आहे. (Biotion Reach Foods In 20 Rupees For Long And Thick Hairs)
हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार बायोटीन केसांच्या वाढीसाठी तेव्हाच मदत करते तेव्हा ते शरीराला पुरेपूर मिळते आणि बायोटीनची कमतरता नसते. बायोटीन व्हिटामीन बी कॉम्पलेक्सचा एक भाग आहे. व्हिटामीन बी-७ ला बायोटीन असं म्हटलं जातं. बायोटीन अन्नाला एनर्जीमध्ये बदलण्याचं काम करते.
ज्यामुळे केराटीन बनवण्यासही मदत होते. केस, त्वचा आणि नखांसाठी हे प्रमुख प्रोटीन आहे. शरीरात बायोटीनची कमतरता भासल्यास केस गळणं, केस पातळ होणं, नखं तुटणं, त्वचेवर रॅश येणं अशा समस्या उद्भवतात. बायोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही नट्स, संतुलित आहार आणि हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.(Ref)
२० रूपयांत कोणते पदार्थ खाऊ शकता?
शेंगदाणे हा बायोटीनचा सर्वात स्वस्त आणि चांगला स्त्रोत आहे. यात बायोटीनसोबतच प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स असतात जे केसांना नैसर्गिक चमक देतात.
रताळ्यांमध्ये बायोटीनचे प्रमाण चांगले असते. यात बिटा कॅरोटीन देखील असते जे टाळूचे आारोग्य सुधारते. सकाळच्या नाश्त्याला तुम्ही रताळे खाऊ शकता.
याशिवाय केळी हे एक सुपर फूड आहे जे खिशाला परवडणारे आहे. यात बायोटीन, फायबर्स, पोटॅशियम असते जे केसांची गळती रोखण्यास मदत करते.
जर तुम्ही सुक्या मेव्याचा स्वस्त पर्याय शोधत असाल तर सुर्यफुलाच्या बिया उत्तम हेत. यात बायोटीन आणि व्हिटामीन ई असते. जे केसांच्या वाढीसाठी पोषक आहे.
पालेभाज्यांमध्ये पालक हा बायोटीनचा चांगला स्त्रोत आहे. पालकात लोह भरपूर असते ज्यामुळे केस मजबूत होतात.
Web Summary : Hair problems are common nowadays. Biotin, found in foods like peanuts, sweet potatoes, bananas, sunflower seeds, and spinach, can help. These affordable options provide essential nutrients for hair health, addressing concerns like hair fall and promoting stronger, thicker hair.
Web Summary : आजकल बालों की समस्याएँ आम हैं। मूंगफली, शकरकंद, केला, सूरजमुखी के बीज और पालक जैसे खाद्य पदार्थों में बायोटिन पाया जाता है, जो मदद कर सकता है। ये किफायती विकल्प बालों के स्वास्थ्य के लिए जरूरी पोषक तत्व प्रदान करते हैं, बालों के झड़ने जैसी चिंताओं को दूर करते हैं और मजबूत, घने बालों को बढ़ावा देते हैं।