Join us

भाग्यश्री सांगतेय 'या' फळाचे साल चेहर्‍याला लावा; सुरकुत्या-डार्क सर्कल्स पटकन होतील गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 12:15 IST

Banana Peels To Reduce Dark Circles, Home Remedies For Dark Circles : अभिनेत्री भाग्यश्रीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही टिप्स शेअर केल्या आहेत.

फळांचा गर किंवा फुलांचा रस त्वचेसाठी बराच फायदेशीर ठरतो. पण त्याची सालंही काही प्रमाणात फायदेशीर ठरतात. या फळांचे साल चेहऱ्याला योग्य पद्धतीनं लावल्यास चेहरा उजळ होतो. अभिनेत्री भाग्यश्रीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही टिप्स शेअर केल्या आहेत. (Home Remedies For Dark Circles)

या व्हिडिओत भाग्यश्री केळ्याच्या साली फेकण्याऐवजी चेहऱ्याला लावताना दिसून येत आहे. यामुळे फक्त डार्क सर्कल्स कमी होत नाही तर हलक्या सुरकुत्याही येतात. चेहऱ्यावर कोणकोणत्या पद्धतीनं फळाची साल लावता येईल समजून घेऊ. (Bhagyashree Uses Banana Peels To Reduce Dark Circles And Pigmentation Banana Peel Benefits)

डार्क सर्कल्स आणि सुरकुत्यांसाठी केळ्याच्या सालीचा वापर

आजकाल प्रत्येकालाच डार्क सर्कल्स, सुरकुत्यांचा सामना करावा लागतो. भाग्यश्री सांगते की केळी खाल्ल्यानंतर याची साल म्हणजेच मागचा भाग त्वचेवर चोळून घ्या. यामुळे त्वचा चमकदार दिसेल. सुरकुत्या कमी होण्यासही मदत होते. चेहऱ्यावर तुम्ही केळीच्या सालीचा फेस मास्क लावू शकता. चेहऱ्याला २० मिनिटांसाठी हा पॅक लावून ठेवा नंतर चेहरा धुवून टाका. केळ्याच्या साली बारीक करून त्यात हळद, साखर घालून स्क्रब तयार करू शकता. हा स्क्रब चेहऱ्याला लावून हलक्या हातानं चेहरा चोळून घ्या. या उपायानं त्वचेवर चांगला परीणाम दिसून येईल.

केळीच्या साली का फायदेशीर ठरतात

केळीच्या साली त्वचेसाठी बऱ्याच फायदेशीर ठरतात. या सालींत एंटी ऑक्सिडेंट्स असतात. या साली फॅटी एसिड्सचा चांगला स्त्रोत आहेत. यातून त्वचेला पोटॅशियम मिळते. यात व्हिटामीन ए, जिंक, मॅग्ननीज असते. या साली चेहऱ्याला लावल्यास त्वचा उजळते. या साली त्वचेला एंटी एजिंग गुण प्रदान करतात. याशिवाय तुम्ही संत्र्याचे साल, पपईचे सालसुद्धा केसांना लावू शकता.

डाळ-तांदूळ न भिजवता करा हॉटेलस्टाईल मसाला डोसा; तव्याला न चिकटता डोसा होईल क्रिस्पी

ही सालं चेहऱ्याला लावल्यानं सुंदर ग्लो येतो. केळ्याची साल कोरफड आणि मध मिसळून चेहऱ्याला लावल्यानं मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. याशिवाय त्वचेला ग्लो मिळतो. केळ्याच्या साली चेहऱ्याला लावल्यानं त्वचेवर तेज येते आणि फेशियलसारखा  परीणाम दिसून येतो.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी