हिवाळ्यात किंवा ऋतू बदलताना त्वचा सर्वात त्रास देऊ लागते. त्वचेचा कोरडेपणा, डल दिसणारी त्वचा, निस्तेज त्वचेमुळे अनेकांना रुक्ष त्वचेचा सामना करावा लागतो.(Winter skincare routine) या दिवसात त्वचेला हायड्रेट ठेवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.(Night skincare routine) अनेकदा या ऋतूमध्ये आपण महागडे स्किनकेअर खरेदी करतात. मॉइश्चरायझर लावतो, पण खरं म्हणजे त्वचेची नियमितपणे योग्य काळजी घेतली तर ती स्वतःहूनही टवटवीत दिसू शकते.(How to get glowing skin overnight)
आजकाल आपण दिवसभरात कितीदा चेहरा धुतो, किती प्रोडक्ट्स वापरतो, किती वेळ स्क्रीनसमोर असतो. याचा आपल्या त्वचेवर मोठा परिणाम होतो.(Home remedies for glowing skin) रात्रीची वेळ ही त्वचा दुरुस्ती करण्याची नैसर्गिक प्रक्रिया असते. दिवसभर धूळ, प्रदूषण, मेकअप यांचा सामना केल्यामुळे त्वचा निस्तेज दिसू लागते.(Dry skin treatment at home) त्यासाठी झोपण्यापूर्वी त्वचेवर काय लावायला हवं जाणून घेऊया.
केसगळती वाढली- टक्कल पडण्याची भीती? केसांना तेल लावताना 3 चुका टाळा, केस गळणं करा बंद..
1. झोपण्यापूर्वी चेहऱ्याला नारळाचे तेल लावू शकतो. ते नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. रात्रभर तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म देखील आहेत. जे निरोगी त्वचा राखण्यास मदत होते. आपल्याला सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ धुवून नारळाच्या तेलाचे काही थेंब लावा आणि हळूवारपणे मालिश करा. यामुळे त्वचा हळूहळू मऊ आणि चमकदार होईल.
2. झोपण्यापूर्वी आपण आपल्या चेहऱ्यावर कोरफडीचा गर देखील लावू शकतो. हे नैसर्गिक मॉइश्चरायझिंग एजंट म्हणून काम करते आणि त्वचेला हायड्रेट ठेवते. मुरुमे आणि डाग यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. यामुळे आपली त्वचा चमकदार, मऊ करण्यासाठी रात्री चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा.
3. रात्री चेहऱ्यावर झोपण्यापूर्वी मध लावू शकतो. त्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटी- इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. जे त्वचेवरील मुरुमे आणि डाग काढून टाकण्यास मदत करतात. ते त्वचा मऊ-मुलायम करण्यास मदत करते.
4. इतकेच नाही तर आपण चेहऱ्याला आपण पपईची पेस्ट देखील लावू शकतो. त्वचेला पपईची पेस्ट, मध, लिंबाचा रस आणि मुलतानी माती लागेल. हा फेस पॅक चेहऱ्याला २० ते ३० मिनिटे लावा. नंतर कोमट पाण्याने त्वचा धुवा. यामुळे चेहऱ्यावर चमक येईल.
