Lokmat Sakhi >Beauty > Navratri Skin Care : पिंपल्स- फोडांमुळे चेहरा खराब दिसतो? स्वयंपाकघरातील २ पदार्थ करतील जादू, डाग गायब- चेहऱ्यावर येईल तेज

Navratri Skin Care : पिंपल्स- फोडांमुळे चेहरा खराब दिसतो? स्वयंपाकघरातील २ पदार्थ करतील जादू, डाग गायब- चेहऱ्यावर येईल तेज

Navratri skin care: Navratri face care: pimples home remedies: घरगुती उपाय केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डागही कमी होतील. ज्यामुळे चेहऱ्यावर तेजही येईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2025 12:31 IST2025-09-22T12:30:57+5:302025-09-22T12:31:52+5:30

Navratri skin care: Navratri face care: pimples home remedies: घरगुती उपाय केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डागही कमी होतील. ज्यामुळे चेहऱ्यावर तेजही येईल.

best skin care tips for Navratri natural remedies for acne and pimples home remedies for clear glowing skin kitchen ingredients for spotless skin | Navratri Skin Care : पिंपल्स- फोडांमुळे चेहरा खराब दिसतो? स्वयंपाकघरातील २ पदार्थ करतील जादू, डाग गायब- चेहऱ्यावर येईल तेज

Navratri Skin Care : पिंपल्स- फोडांमुळे चेहरा खराब दिसतो? स्वयंपाकघरातील २ पदार्थ करतील जादू, डाग गायब- चेहऱ्यावर येईल तेज

नवरात्री म्हणजे सण, रंग आणि आनंदाचा काळ. या नऊ दिवसांत आपण नटून-थटून देवीचं स्वागत करतो.(Navratri skin care) पण या काळात चेहऱ्यावर पिंपल्स, फोड किंवा डाग यामुळे अनेकांना त्रास होतो.(Navratri face care) मेकअपने लपवण्याचा प्रयत्न जरी केला तरी नैसर्गिक ग्लो हरवलेला जाणवतो आणि सेल्फ-कॉन्फिडन्स कमी होतो.(pimples home remedies)
महागडे फेसपॅक, केमिकल्स उत्पादने वापरुन चेहरा आणखी खराब होतो.(kitchen remedies for pimples) पिंपल्स आणि फोडांच्या डागामुळे चेहरा खराब दिसतो. पण अशावेळी काही घरगुती उपाय केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डागही कमी होतील. ज्यामुळे चेहऱ्यावर तेजही येईल. (dark spot removal tips)

टाचांच्या भेगा खूप वाढल्या, चालताना दुखते? ग्लिसरीनमध्ये मिसळून लावा १ पदार्थ- टाचा होतील मऊ

प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर ग्रिन्सी गांधी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी स्वयंपाकघरातील दोन पदार्थांचा वापर करुन पिंपल्स आणि फोडांचे डाग कमी करण्याचा उपाय सुचवला. 

आपल्याला एका भांड्यात हळद आणि मध घ्यावी लागेल. ही पेस्ट आपल्याला मुरुमांवर लावावी लागेल. हे १० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. या उपायामुळे मुरुमे बरे होतील आणि त्वचेचा लालसरपणा, सूज देखील कमी होईल. मध आणि हळदीचे मिश्रण मुरुमांवर लावल्याने सूज आणि लालसरपणा कमी होतो. हे चेहऱ्यावरील बॅक्टेरिया कमी करण्यास मदत करतात. यामुळे त्वचेला आराम देखील मिळतो. हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे मुरुमांना लवकर बरे करण्यास आणि डाग हलके करण्यास मदत करतात. 

हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. जे पिंपल्स आणि जळजळ कमी करुन त्वचा स्वच्छ करतात. रोज रात्री हळदीचा लेप लावल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग कमी होतील. त्याचबरोबर मध हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. जे त्वचेतील कोरडेपणा दूर करतात. हा फेसपॅक आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावल्यास नैसर्गिक ग्लो मिळेल आणि डागही कमी होतील. 


Web Title: best skin care tips for Navratri natural remedies for acne and pimples home remedies for clear glowing skin kitchen ingredients for spotless skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.