Join us

पांढरे केस जास्तच वाढलेत? १ घरगुती उपाय, डाय-मेहेंदी काहीच न लावता काळेभोर होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 11:11 IST

Best Remedy For White Hair :

आजकाल वेळेआधीच लोकांना केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते. पांढरे केस लपवण्याासाठी लोक हेअर डायचा वापर करतात (Beauty Tips) पण हेअर डायमध्ये वेगवेगळे केमिकल्स असतात ज्यामुळे केसांचे अधिकच नुकसान होते. अशावेळी तुम्ही केसांना काळे करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय करू शकता. कोणते सोपे उपाय केल्यानं केस गळती रोखण्यास मदत होते समजून घेऊ. (Best Remedy For White Hair)

केसांना नैसर्गिकरित्या काळे कसे करावे? (How To Get Black Hairs Naturally)

हेअर एक्सपर्ट आणि हेअर केअर प्रॅक्टिशनर डॉक्टर मदिहा भयानी यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर अधिक माहिती शेअर केली आहे. युट्यूबवरील या व्हिडिओमध्ये त्या सांगतात की तुमचे केस वेळेआधीच पांढरे होत असतील तर ते पूर्णपणे काळे करणं थोडं कठीण आहे. पोषक घटकांची कमतरता, चुकीचं ब्लड सर्क्युलेशन, ताण-तणाव यामुळे केस पांढरे होतात. घरच्याघरी सोप्या पद्धतीनं तुम्ही नॅच्युरल डाय बनवू शकता. हे तयार करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही केमिकल्सची आवश्यकता नाही. केसांना नुकसान  न पोहोचवता तुम्ही दाट केस मिळवू शकता. (How To Remove White Hairs Permanently Naturally At Home)

नॅच्युरल डाय कसा  तयार करायचा? (How To Make Homemade Hair Dye)

सगळ्यात आधी एक लोखंडाची कढई घ्या. लोखंडाच्या भांड्यातून लोह मिळते जे केसांतील मेलानिन वाढवण्यास मदत करतात. त्यासाठी कढई हलकी गरम करा. नंतर कढईत एक ताजा आवळा बारीक करून घाला. यात तुम्ही आवळा पावडरही घालू सकता. नंतर शिकेकाई आणि रिठा पावडर घालून भाजून घ्या. नंतर कढईत बेहडा, लवंग आणि कलौंजी घाला. हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्या त्यात  थोडी मेथी पावडर घाला. शेवटी यात कॅस्टर ऑईल घालून जाड पेस्ट तयार करा (Ref). सर्व पदार्थ एकजीव केल्यानंतर थंड करून, गाळून एका भांड्यात काढा.

केसांना लावण्याची योग्य  पद्धत

हा हर्बल मास्क केसांना तु्म्ही १ ते २ वेळा लावू शकता. हा मास्क लावण्याआधी केस ओले करा. केसांच्या मुळांना ही पेस्ट व्यवस्थित लावा कमीत कमी  १ तास तसंच राहू द्या. नंतर केस स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या. त्याचवेळी शॅम्पूचा वापर करा. जेव्हा केस व्यवस्थित सुकतील तेव्हा रात्री केसांना हलक्या हातानं तेल  लावा.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्सआरोग्य