Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > हिवाळ्यात ओठ फाटू नये, कोरडे पडू नये म्हणून काय करावं? करा 'हे' सोपे, मग बघा कमाल...

हिवाळ्यात ओठ फाटू नये, कोरडे पडू नये म्हणून काय करावं? करा 'हे' सोपे, मग बघा कमाल...

Lip care tips in winter : थंडीच्या दिवसात ओठांची काळजी कशी घ्यावी यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 12:05 IST2025-10-15T11:51:32+5:302025-10-15T12:05:33+5:30

Lip care tips in winter : थंडीच्या दिवसात ओठांची काळजी कशी घ्यावी यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.

Best home remedies for dry skin cheeks and lips in winter | हिवाळ्यात ओठ फाटू नये, कोरडे पडू नये म्हणून काय करावं? करा 'हे' सोपे, मग बघा कमाल...

हिवाळ्यात ओठ फाटू नये, कोरडे पडू नये म्हणून काय करावं? करा 'हे' सोपे, मग बघा कमाल...

Llip care tips in winter : थंडी हलकी जरी जाणवायला लागली की, त्वचेसंबंधी समस्या डोकं वर काढतात. खासकरून ओठ उलतात किंवा कोरडे होतात. ओठांवर भेगा पडतात आणि मासही निघतं. हिवाळ्यात कमी पाणी पिणे, हेल्दी पदार्थ न खाणे आणि जुने प्रॉडक्ट वापरणे ही कारणे सांगता येतील. अशात या दिवसात ओठांची काळजी कशी घ्यावी यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.

ओठांची काळजी कशी घ्याल?

- महिला ओठांवर नेहमीच लिपस्टिक लावतात. ही लिपस्टिक जोर लावून किंवा घासून काढण्याचा प्रयत्न करू नका. याने ओठांची त्वचा घासली जाते. तसेच नेहमी असं केल्याने ओठांचा आकारही बिघडू शकतो.

- जेव्हा तुम्ही चहा पिता किंवा कोणतंही गरम द्रव्य पिता तेव्हा काळजी घ्या की, फार गरम काही सेवन करू नये. कारण ओठ जेव्हा गरम ग्लास किंवा कपाच्या संपर्कात येतात, त्याने ओठाची त्वचा काळवंडते. याने नंतर ओठांचा मुलायमपणाही कमी होतो. 

- हिवाळ्यात हलके पदार्थ भरपूर खावेत आणि पाणीही भरपूर प्यावे. याने ओठांचा मुलायमपणा टिकून राहतो आणि ओठांची काळजीही योग्य पद्धतीने घेतली जाते. ओठांची त्वचा ड्राय होणार नाही. 

- रात्री झोपताना ओठांवर खोबऱ्याचं तेल लावावं. जर खोबऱ्याचं तेल लावायचं नसेल तर  तुम्ही चांगल्या क्वालिटीचं पेट्रोलियम जेली सुद्धा वापरू शकता. जेली लावल्यावर हळुवारपणे तुम्ही ओठांची मसाजही करू शकता.

- जर ओठ फाटत असतील तर मुलायम करण्यासाठी रात्री झोपण्याआधी ओठांवर मध लावावे. सकाळी थंड पाण्याने ओठ धुवावे. ओठ मुलायम होतील.

- हेल्दी पदार्थांचं सेवनही यासाठी महत्वाचं ठरतं. हिवाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि फळं मिळतात. अनेकदा शरीरात आयर्नची कमतरता असेल तर ओठ काळे पडतात. त्यामुळे हेल्दी पदार्थांचं सेवन करणं महत्वाचं ठरतं.

- ओठ तेव्हाच चांगले राहतील जेव्हा ओठांमध्ये ब्लड सर्कुलेशन चांगलं होईल. यासाठी नियमितपणे ओठांची हलक्या हाताने मसाज करावी.

- ओठांवरील लिपस्टिक कलीजिंग मिल्कने काढा. कॉटनवर क्लीजिंग मिल्क लावून ओठ साफ करा. तसेच मलाईमध्ये लिंबू मिश्रित करूनही तुम्ही ओठांची मालिश करू शकता.

अजून काय काळजी घ्याल?

पुरेसं पाणी प्या

हेल्दी आहार घ्या

रात्री झोपण्याआधी नैसर्गिक तेल लावा

ओठ चाटू नकाSPF लिप बाम वापरा

Web Title : सर्दियों में होंठों की देखभाल: सूखे, फटे होंठों से बचने के उपाय

Web Summary : सर्दियों में होंठों को रूखेपन से बचाएं! लिपस्टिक को जोर से न हटाएं, गर्म पेय से बचें। हाइड्रेटेड रहें, स्वस्थ खाएं और रात को नारियल तेल या पेट्रोलियम जेली लगाएं। फटे होंठों के लिए शहद और बेहतर परिसंचरण के लिए मालिश करें।

Web Title : Winter Lip Care: Simple tips to prevent dry, chapped lips.

Web Summary : Combat winter's dry lip woes! Avoid harsh lipstick removal, hot drinks. Hydrate, eat healthy, and apply coconut oil or petroleum jelly nightly. Use honey for cracked lips and massage gently for better circulation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.