आजकाल बऱ्याच लोकांना केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.अशा स्थितीत हेअर फॉल टाळण्यासाठी लोक महागडी उत्पादनं विकत घेतात. तुम्हीसु्द्धा हेअर फॉलच्या त्रासानं वैतागला असाल तर काही सोपे उपाय करून तु्म्ही हेअर फॉलच्या त्रासावर आराम मिळवू शकता (Beetroot Chila For Hair Fall Control).
आपल्या घरातील काही पदार्थ केस गळणं नियंत्रणात ठेवून केसांची चांगली वाढ होण्यासाठी फायदेशीर ठरतात. बीट आणि आवळा हे दोन्ही पदार्थ केसांसाठी रामबाण उपाय आहेत. हे दोन्ही पोषक तत्वांचे पॉवर हाऊस आहेत. या दोन पदार्थांचे कॉम्बिनेशन केसांसाठी फायदेशीर ठरते. (Beetroot Chila Recipe For Hair Fall Control)
यात व्हिटामीन्स, एंटी ऑक्सिडेंट्स असतात. बीटात फायबर्स, नायट्रेटही असते. यात फायटोन्युट्रिएंट्स आणि एंटी ऑक्सिडेंस असतात. आयुर्वेदातही आवळा आणि बीट केसांसाठी फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं. या दोन्ही पदार्थांचा ज्यूस काढून तुम्ही पिऊ शकता किंवा डोसाही बनवू शकता. हे पदार्थ वापरून बनवलेला नाश्ता हेल्दी असून तुमची केस गळण्याची समस्या नियंत्रणात ठेवण्यास मदत करेल. बीट आणि आवळा केसांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतो. यात अनेक पोषक घटकही असतात.आवळा आणि बीट वापरून डोसा कसा करायचा याची सोपी रेसिपी पाहूया.
बीट आवळ्याचा डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य
१) बीट- १ मोठं
२) आवळा- १ मोठा
३) बेसन - दीड कप
४) लाल मिरची पावडर - १ टिस्पून
५) मीठ- चवीनुसार
६) काळी मिरी- १ टिस्पून
केसांसाठी उपयुक्त असा डोसा कसा बनवायचा?
आवळा आणि बिटाचा डोसा करण्यासाठी सगळ्यात आधी दोन्ही पदार्थ व्यवस्थित कापून घ्या. नंतर या पदार्थांची प्युरी तयार करा. नंतर हे पदार्थ व्यवस्थित एकजीव करा. एका भांड्यात बेसन, बिटाची प्युरी, मीठ, काळी मिरी, लाल मिरची पावडर घाला.
केरळस्टाईल जाळीदार, सॉफ्ट अप्पमची खास रेसिपी; ५ मिनिटांत बनेल अप्पम, झटपट नाश्ता
शिजवण्याआधी यात थोडा फ्रुट सॉल्ट घाला. यामुळे डोसा व्यवस्थित फुलेल. तयार मिश्रण तव्यावर व्यवस्थित पसरवून घ्या. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित उटलून घ्या. व्यवस्थित झिजल्यानंतर डोश्याचा रंग बदलायला सुरूवात होईल. हा डोसा चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.