Join us

चाळिशी नंतर रोज सकाळी तुरटीच्या पाण्यानं धुवा चेहरा, वय वाढल्यावरही दिसाल तरूण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 14:33 IST

Benefits of Washing Face with Alum Water: तुरटीच्या पाण्यानं चेहरा धुवू शकता, यानं त्वचेवरील मळ, धूळ, डेड स्किन निघून जाते. अशात चाळिशीनंतर तुरटीनं चेहरा धुतल्यानं काय फायदे मिळू शकतील हे जाणून घेऊ.

Benefits of Washing Face with Alum Water: सामान्यपणे तुरटी सगळ्यांच घरांमध्ये आढळते. पुरूष त्वचेवर लावण्यासाठी तुरटीचा वापर करतात. खासकरून शेव्हिंग केल्यावर. कारण यानं त्वचेचा इन्फेक्शनपासून बचाव होतो. पण असं अजिबात नाही की, महिला तुरटी वापरू शकत नाहीत. त्वचेला अनेक फायदे देण्यासाठी तुरटी मदत करते. त्यात तुम्ही जर चाळिशी ओलांडली असेल तर त्वचा तरूण आणि ग्लोईंग ठेवण्यासाठी तुरटी वापरली जाऊ शकते. तुरटी फेस पॅकच्या रूपात लावू शकता. तुरटीच्या पाण्यानं चेहरा धुवू शकता, यानं त्वचेवरील मळ, धूळ, डेड स्किन निघून जाते. अशात चाळिशीनंतर तुरटीनं चेहरा धुतल्यानं काय फायदे मिळू शकतील हे जाणून घेऊ.

तेलकटपणा होईल दूर

४० वयानंतर अनेक महिलांची त्वचा अधिक तेलकट दिसू लागते. अशात तुरटीच्या पाण्यानं चेहरा धुतल्यास फायदा मिळू शकतो. तुरटीमुळे त्वचेतील एक्स्ट्रा तेल निघून जातं. ज्यामुळे त्वचेचा चिकटपणा दूर होतो आणि चेहरा फ्रेश दिसतो. तुमची त्वचा जर तेलकट असेल तर तुरटी चेहरा धुवू शकता.

सुरकुत्या होतील दूर

ही बाब तर कॉमन आहे की, वाढत्या वयात चेहऱ्यावर सुरकुत्या आणि फाइन लाइन्स दिसू लागतात. तुमच्याही चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत असतील तर तुम्ही तुरटीच्या पाण्यानं चेहरा धुवा. यातील अनेक गुणांमुळे त्वचा टाइट होते आणि सुरकुत्याही दूर होतात. ज्यामुळे त्वचा अधिक तरूण दिसते. 

डाग-चट्टे होतील दूर

जर रोज सकाळी तुरटीच्या पाण्यानं तुम्ही चेहरा धुवाल तर यामुळे चेहऱ्यावरील डाग-चट्टेही दूर होतील. तुरटीमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात, जे पिंपल्ससोबतच डाग व चट्टेही दूर करतात. जर तुमच्या त्वचेवर पिगमेंटेशन असेल तर तुरटीचं पाणी फायदेशीर ठरू शकेल. 

त्वचा टाइट होते

बऱ्याचदा वाढत्या वयात त्वचा सैल आणि निर्जीव दिसू लागते. अशात तुरटीचं पाणी फायदेशीर ठरू शकतं. तुरटीनं चेहरा धुतल्यास त्वचा टाइट होते. ज्यामुळे चेहऱ्यावरील वाढत्या वयाची लक्षणंही कमी होतात. अशात नियमितपणे तुरटीच्या पाण्यानं चेहरा धुवावा.

तुरटीच्या पाण्यानं चेहरा कसा धुवाल?

चाळिशी पार केलेल्या महिला रोज सकाळी तुरटीच्या पाण्यानं चेहरा धुवू शकता. यासाठी एका वाटीमध्ये गुलाबजल घ्या. त्यात तुरटीचा एक छोटा तुकडा टाका किंवा तुरटीचं पावडर टाका. आता हे पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १ ते २ मिनिटं हळूहळू मसाज करा. त्यानंतर चेहरा साध्या पाण्यानं धुवून घ्या. जर तुमची त्वचा संवेदनशील किंवा ड्राय असेल तर तुरटीचा जास्त वापर करू नये.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स