Join us

झोपेतून उठल्यावर साबण किंवा फेसवॉश नको, तुरटीनं धुवा चेहरा! फायदे वाचून रोज कराल हा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 15:17 IST

Alum for face wash : जर सकाळी झोपेतून उठून तुम्ही साबणाऐवजी तुरटीनं चेहरा धुतला तर तुम्हाला एकापेक्षा जास्त फायदे मिळू शकतात. तेच जाणून घेऊया.

Alum for face wash : त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी आणि त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी बरेचजण तुरटीचा वापर करतात. पण अजूनही बऱ्याच लोकांना याचे फायदे आणि याचा वापर कसा करावा हे माहीत नाही. अनेकांना हेच माहीत आहे की, दाढी केल्यानंतर पुरूषांच्या त्वचेवर फिरवली जाते. मात्र याचा हा एकच फायदा नाही. तुरटीचे वेगवेगळे फायदे आहेत. जर सकाळी झोपेतून उठून तुम्ही साबणाऐवजी तुरटीनं चेहरा धुतला तर तुम्हाला एकापेक्षा जास्त फायदे मिळू शकतात. तेच जाणून घेऊया.

चेहरा धुण्यासाठी तुरटीचा वापर करणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. कारण तुरटी एक नॅचरल गोष्ट आहे, ज्याचे साइड इफेक्ट्स होत नाहीत. उलट त्वचेला अनेक फायदे मिळतात. तुरटी एक नॅचरल अ‍ॅंटी-सेप्टिक आहे ज्यात त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्याची क्षमता असते.

चेहऱ्यावर तुरटी लावण्याचे फायदे

चेहऱ्यावर तुरटी लावून तुम्ही चेहरा चमकदार आणि क्लीन करू शकता. तुरटी चेहऱ्यावर लावल्यानं त्वचेची अ‍ॅलर्जी, पिंपल व इंफेक्शन धोका कमी होतो. तसेच त्वचेवरील अतिरिक्त ऑइलही निघून जातं. ज्यामुळे त्वचा ग्लोईंग दिसते. तुरटीतील तत्वांमुळे त्वचा आतपर्यंत स्वच्छ होते आणि बुजलेली रोमछिद्रे मोकळी होतात. 

वापरण्याची योग्य पद्धत

तुरटी चेहऱ्यावर लावण्याची पद्धत एकदम सोपी आहे. सकाळी झोपेतून उठल्यावर ज्याप्रकारे तुम्ही आधी चेहऱ्याला पाणी लावता आणि नंतर साबणानं धुता. तशीच तुरटी साबणासारखी चेहऱ्यावर फिरवा आणि 2 ते 3 मिनिटं फिरवत रहा. नंतर पाण्यानं चेहरा चांगला धुवा आणि कॉटनच्या कापडानं हलक्या हातानं पुसा.

किती वेळा लावाल?

चेहरा धुण्यासाठी तुरटीचा योग्य वापर करणं महत्वाचं ठरतं. एकदा सकाळी तुम्ही तुरटी चेहरा धुवा. एकदा चेहरा धुवूनही तुम्हाला फायदा मिळेल. हवं तर तुम्ही दिवसातून दोनदा तुरटीनं चेहरा धुवू शकता. दोनपेक्षा जास्त वेळ तुरटीनं चेहरा धुवू नये. कारण यानं त्वचा ड्राय होण्याचा धोका असतो.

काय काळजी घ्याल?

तुरटी लावल्यानं काही लोकांना त्वचेवर खाज, जळजळ होऊ शकते. जर तुमची त्वचा खूप जास्त ड्राय असेल तर तुरटीचा वापर टाळावा. जर तुरटी लावल्यावर काही समस्या होत असेल तर डॉक्टरांना भेटा. तसेच तुरटीनं चेहरा धुतल्यावर तुम्ही चेहऱ्यावर सनस्क्रीन, बॉडी लोशन, मॉइश्चरायजर किंवा खोबऱ्याचं तेल लावू शकता.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स