Tomato Skin Benefits: टोमॅटो ही फक्त एक भाजी नसून त्यापेक्षा खूप जास्त आहे. जेवणात चव वाढवण्यासोबतच टोमॅटो आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो. इतकंच नाही तर त्वचेसाठीही टोमॅटो फार गुणकारी आहे. टोमॅटोमध्ये व्हिटामिन C, व्हिटामिन A आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवतात.
जर तुम्हाला तुमचा चेहरा नॅचरली उजळलेला दिसावा असे वाटत असेल, तर टोमॅटोचा वापर नक्की करा. टोमॅटो त्वचेवरील डाग-चट्टे कमी करतो, डलनेस दूर करतो आणि नैसर्गिक ग्लो देतो. चला तर पाहूया, त्वचेसाठी टमाटरचा वापर कसा करावा.
त्वचेसाठी टोमॅटोचे फायदे
टोमॅटोमध्ये असलेले व्हिटामिन C आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचा हेल्दी राखतात. डाग-चट्टे कमी करण्यात टोमॅटो अत्यंत प्रभावी आहे. यातील व्हिटामिन A त्वचेची चमक वाढवते. टोमॅटोतील पाण्याचे प्रमाण त्वचेचा हायड्रेशन टिकवून ठेवते. तसेच यातील लायकोपीन त्वचेची डलनेस कमी करून नैसर्गिक तेज आणतो.
टोमॅटो फेस पॅक
त्वचा चमकदार बनवण्यासाठी घरच्या घरी टोमॅटो फेस पॅक तयार करू शकता.
कसा तयार कराल?
टोमॅटो मिक्सरमध्ये फिरवून त्याचा रस काढा. त्यात १ चमचा दही किंवा मध मिसळा. चांगले मिश्रण करून चेहऱ्यावर लावा. १५–२० मिनिटांनी पाण्याने धुवा. हा फेस पॅक त्वचा सॉफ्ट, फ्रेश आणि ग्लोइंग बनवतो.
टोमॅटो फेस स्क्रब
टोमॅटोचा वापर स्क्रब म्हणूनही करता येतो.
कसा वापराल?
टोमॅटोचा गर काढा. त्यात बेसन किंवा थोडी साखर मिसळा. या मिश्रणाने हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे डेड स्किन सेल्स दूर होतात आणि त्वचा अधिक मुलायम व तजेलदार दिसते.
