Join us

चेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग, पिंपल्स दूर करण्यासाठी खास सॉल्ट स्क्रब, जाणून घ्या कसा कराल तयार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 11:39 IST

Salt Scrub : महत्त्वाची बाब म्हणजे या स्क्रबने त्वचेचं नुकसान होत नाही. तर याने त्वचेवरील मृत पेशी दूर होतात आणि त्वचेवर चमक येते.

Salt Scrub : तुमचा चेहरा पिंपल्समुळे खराब झाला असेल किंवा चेहऱ्यावर डाग पडले असतील तर ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही एक खास उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय म्हणजे सॉल्ट स्क्रब. हा स्क्रब आहे सॉल्ट स्क्रब म्हणजे मिठापासून तयार स्क्रब. हा स्क्रब तुम्ही घरीच तयार करू शकता. फक्त यात तुम्हाला घरात सहज मिळणाऱ्या इतरही काही गोष्टींचा समावेश करावा लागेल. महत्त्वाची बाब म्हणजे या स्क्रबने त्वचेचं नुकसान होत नाही. तर याने त्वचेवरील मृत पेशी दूर होतात आणि त्वचेवर चमक येते. चला जाणून घेऊ कसा तयार करायचा हा स्क्रब आणि याचे फायदे....

सॉल्ट स्क्रब

आंघोळ केल्यानंतर सैंधव मीठ म्हणजेच एप्सम सॉल्ट आणि स्क्रब आपल्या हातांच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावर हात गोल फिरवत हे लावा. याने त्वचेवरील मृत पेशी दूर होतील आणि त्वचेची रोमछिद्रे मोकळी होतील. जर नाकाजवळ जास्त ब्लॅकहेड्स असतील तर तिथे हळुहळु स्क्रब करा. सॉल्ट स्क्रब तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरु शकता.

सैंधव मीठ आणि लेमन स्क्रब

हा त्वचेसाठी एक प्रभावी स्क्रब असून केवळ काही मिनिटात तयार होतं. लिंबाच्या रसाचे काही थेंब सॉल्ट स्क्रबमध्ये टाका आणि चेहऱ्यावर स्क्रब करा. याने पिंपल्स, मृत त्वचा आणि ब्लॅकहेड्स सहजपणे दूर होतात. 

सॉल्ट आणि ऑइल स्क्रब

आपली त्वचा स्वच्छ करण्यासाठी मिठात काही चांगल्याप्रकारचे तेल जसे की, लेवेंडर, पेपरमिंट किंवा रोजमेरी इत्यादी तेल मिश्रित करा. हा स्क्रब महिन्यातून केवळ एकदाच वापरा. याने चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतील. 

काही घरगुती सॉल्ट स्क्रब

सैंधव मीठ आणि मध

उन्हाळ्यात हा एक चांगला स्क्रब ठरु शकतो. यात मध टाकल्यानं टॅनिंग दूर होते आणि मृत त्वचाही दूर होते. एक चमचा मध आणि त्यात थोडं मीठ टाका. हे मिश्रण चेहऱ्यावर १० मिनिटांसाठी लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.

मीठ आणि ओटमील

हा स्क्रब तयार करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये दोन चमचे ओटमील, एक चमचा सैंधव मीठ, लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि बदामाच्या तेलाचे काही थेंब घ्यावे लागतील. हे मिश्रण चेहऱ्यावर दोन मिनिटांसाठी लावून चेहरा स्क्रब करा. नंतर पाच ते सहा मिनिटांनी थंड पाण्याचे चेहरा धुवा.

स्क्रबिंगनंतर...

स्क्रबिंग केल्यानंतर त्वचेची स्वच्छताही चांगली केली पाहिजे. याने त्वचेवर जास्त चमक येईल. यासाठी काकडीचा ज्यूस, टोमॅटो ज्यूस, पपईचा गर आणि केळ्याचा गर वापरता येतो. त्यासोबतच मॉइश्चरायजरही लावू शकता. 

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स