Join us
Daily Top 2Weekly Top 5

३०० रुपयांची महागडी क्रिम की ७० रुपयांचं तेल? रोज आंघोळीपूर्वी खोबरेल तेलाचा हा उपाय सतेज -सुंदर त्वच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 18:02 IST

Oil For Dry Skin Remedies : जास्तीत जास्त लोकांना थंडीत कोरड पडलेली, निस्तेज, पापडी पडलेली आणि ताण जाणवणारी त्वचा त्रास देते. जर तुम्हालाही अशी समस्या होत असेल, तर आंघोळीपूर्वी शरीरावर ही ‘पांढरी गोष्ट’ नक्की लावा.

Oil For Dry Skin Remedies : थंडी वाढली की त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. गरम पाण्याने आंघोळ करणे, थंड वारे आणि हवेतल्या कोरडेपणामुळे त्वचा आणखी ड्राय होते. या काळात लोक पाणीही कमी पितात, ज्याचा थेट परिणाम त्वचेवर दिसतो. जास्तीत जास्त लोकांना कोरड पडलेली, निस्तेज, पापडी पडलेली आणि ताण जाणवणारी त्वचा त्रास देते. जर तुम्हालाही अशी समस्या होत असेल, तर आंघोळीपूर्वी शरीरावर ही ‘पांढरी गोष्ट’ नक्की लावा. आजी आजोबांचा हा जुना उपाय त्वचा मुलायम, गुळगुळीत आणि पोषक बनवण्यासाठी खूप प्रभावी आहे. 

आंघोळीपूर्वी त्वचेवर लावा 'ही' पांढरी गोष्ट

आंघोळ करण्यापूर्वी पूर्ण शरीरावर खोबऱ्याचं तेल चांगले लावा. हिवाळ्यात खोबऱ्याचं तेल घट्ट, पांढऱ्या मलईसारखं होतं. ते हलकं गरम करून किंवा हातात चोळून वितळवून लावू शकता. खोबऱ्याच्या तेलानं मसाज केल्यानंतर कोमट पाण्याने आंघोळ करा. ज्या दिवशी तुम्ही नारळाचे तेल लावता, त्या दिवशी शक्यतो साबण वापरू नका. यामुळे त्वचेच्या आतपर्यंत तेलाचा परिणाम पोहोचतो. काहीच दिवसांत तुमची कोरडी त्वचा अगदी मऊ आणि तजेलदार होईल. खोबऱ्याचं तेल लावल्यानंतर त्वचा इतकी गुळगुळीत होते की पाण्याचा थेंबही टिकत नाही.

ड्राय स्किनसाठी उपाय

खोबऱ्याच्या तेलाशिवाय तुम्ही बदाम तेलही वापरू शकता.

शिया बटर त्वचेला खोलवरून हायड्रेट करतं आणि पोषण देतं.

हिवाळ्यात अ‍ॅलोवेरा वापरणेही फायदेशीर आहे. हे त्वचेला ओलावा आणि पोषण देऊन ती मऊ ठेवते.

फाटलेल्या त्वचेसाठी टिप्स

हिवाळ्यात त्वचा मऊ, कोमल आणि निरोगी ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी खालील टिप्स.

खूप गरम पाण्याने आंघोळ करू नका.

रोज आंघोळीनंतर त्वचेवर अ‍ॅलोवेरा जेल किंवा लोशन नक्की लावा.

दिवसभरात 2–3 लिटर पाणी प्या.

आहारात ज्यूस आणि इतर तरल पदार्थ समाविष्ट करा.

English
हिंदी सारांश
Web Title : Coconut oil before bath: A simple trick for soft skin.

Web Summary : Combat winter dryness with coconut oil before bathing. This age-old remedy hydrates and softens skin. Apply, massage, and rinse with lukewarm water. Skip soap for better absorption. Stay hydrated and use aloe vera for healthy skin.
टॅग्स :त्वचेची काळजीथंडीत त्वचेची काळजी