lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > कोरियन तरुणींचं ब्यूटी सिक्रेट, तांदुळाच्या पिठात घाला फक्त २ गोष्टी; त्वचा चमकेल इतकी की..

कोरियन तरुणींचं ब्यूटी सिक्रेट, तांदुळाच्या पिठात घाला फक्त २ गोष्टी; त्वचा चमकेल इतकी की..

Benefits of Rice Flour for Healthy and Glowing Skin : काचेप्रमाणे तुमचीही त्वचा चकचकीत चमकेल, फक्त तांदुळाच्या पिठात २ गोष्टी मिसळून लावा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2024 01:21 PM2024-02-25T13:21:58+5:302024-02-25T14:51:57+5:30

Benefits of Rice Flour for Healthy and Glowing Skin : काचेप्रमाणे तुमचीही त्वचा चकचकीत चमकेल, फक्त तांदुळाच्या पिठात २ गोष्टी मिसळून लावा..

Benefits of Rice Flour for Healthy and Glowing Skin | कोरियन तरुणींचं ब्यूटी सिक्रेट, तांदुळाच्या पिठात घाला फक्त २ गोष्टी; त्वचा चमकेल इतकी की..

कोरियन तरुणींचं ब्यूटी सिक्रेट, तांदुळाच्या पिठात घाला फक्त २ गोष्टी; त्वचा चमकेल इतकी की..

सध्या तरुणाईला कोरियन ड्रामाची भुरळ पडली आहे. त्यातील कॅरेक्टर लोकांना भावत आहेत. यासह कोरियन लोकांची स्किन इतकी तुकतुकीत आणि तजेलदार कशी? असाही प्रश्न महिलावर्गामध्ये उपस्थित होत आहे. पण खरंच आपण कधी विचार केला आहे का, की कोरियन लोकांची स्किन इतकी ब्राईट आणि तजेलदार का दिसते? (Skin Care Tips) जर आपल्याला कोरियन लोकांसारखी तजेलदार सॉफट स्किन हवी असेल तर, तांदुळाच्या पिठाचा वापर करून फेस पॅक तयार करा (Korean Beauty Secret).

या फेस पॅकच्या मदतीने उन्हामुळे चेहऱ्यावर साचलेली घाण, टॅन तर निघेलच शिवाय, स्किन काचेप्रमाणे चकाकेल(Benefits of Rice Flour for Healthy and Glowing Skin).

कोरिअन फेस पॅक करण्यासाठी लागणारं साहित्य

तांदुळाचं पीठ

मध

ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? ५ रुपयांच्या कडीपत्त्यात मिसळा एक काळं पाणी, शायनिंग केसांच सुपर सिक्रेट..

दूध

अशा पद्धतीने तयार करा फेस पॅक

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये २ चमचे तांदुळाचं पीठ घ्या. त्यात एक चमचा मध आणि २ चमचे दूध घालून चमच्याने मिक्स करा. अशा प्रकारे कोरिअन फेस पॅक रेडी.

कोरियन फेस पॅक चेहऱ्यावर लावण्याची पद्धत

सर्वप्रथम, चेहरा स्वच्छ धुवून घ्या. तयार पेस्ट चमचा किंवा हाताने लावून पसरवा, व थोड्या वेळासाठी मसाज करा. १० ते २० मिनिटांसाठी पेस्ट चेहऱ्यावर तशीच ठेवा. नंतर थंड पाण्याने धुवून घ्या. आपण या कोरियन फेस पॅकचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता.

चेहऱ्यावर कोरियन फेस पॅक लावण्याचे फायदे

तांदुळाचं पीठ

तांदुळाच्या पीठामध्ये अँटीऑक्सडंट गुणधर्म आढळतात. ज्यामुळे डार्क स्पॉट, काळे डाग, मुरुमांचे डाग यासह इतर स्किनच्या निगडीत समस्या दूर होतात. शिवाय तांदुळाचं पीठ त्वचेसाठी एखाद्या उत्तम एक्सफोलिएटरप्रमाणे काम करते. ज्यामुळे डेड स्किन निघून जातात.

मध

मध नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते. ज्यामुळे चेहऱ्यावर साचलेली घाण आणि तेल साफ होते. शिवाय त्वचेवर नैसर्गिक तेज निर्माण होते.

आरोग्यासाठी घातक-चेहऱ्यासाठी वरदान; चमचाभर साखरेची चालते चेहऱ्यावर जादू-येईल नैसर्गिक तेज

दूध

दूध एक्सफोलिएटर म्हणून काम करते. मुख्य म्हणजे त्वचा स्वच्छ करते. दूध लावल्याने त्वचेच्या मृत पेशी निघून जातात आणि त्वचा अधिक स्वच्छ आणि उजळ दिसते.

Web Title: Benefits of Rice Flour for Healthy and Glowing Skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.