Join us

घरच्याघरी तयार करा महागडा ओटमील स्क्रब, खरखरीत-निस्तेज चेहरा दिसेल तेजस्वी आणि चमकदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 18:10 IST

Oatmeal Scrub : बाजारात मिळणाऱ्या स्क्रब्समधील केमिकल्समुळे त्वचेचं अधिक नुकसान होतं. त्यामुळे घरगुती आणि नैसर्गिक पर्याय वापरणं नेहमीच फायदेशीर ठरतं.

Oatmeal Scrub : रोजची दगदग, कामाचा वाढता ताण, धूळ, प्रदूषण, वाढतं तापमान आणि आहारातील मोठ्या बदलाचा आपल्या त्वचेवरही प्रभाव दिसून येतो. त्वचा डल, निर्जीव आणि रखरखती दिसू लागते. ड्रायनेसही वाढतो. अशात त्वचा आतून साफ करण्यासाठी नियमितपणे स्क्रबिंग करणं खूप गरजेचं होते, जेणेकरून त्वचेवरील मृत पेशी काढता येतील, पोर्स स्वच्छ राहतील आणि तुमची त्वचा पुन्हा ग्लोइंग दिसेल.

पण बाजारात मिळणाऱ्या स्क्रब्समधील केमिकल्समुळे त्वचेचं अधिक नुकसान होतं. त्यामुळे घरगुती आणि नैसर्गिक पर्याय वापरणं नेहमीच फायदेशीर ठरतं. ओटमील स्क्रब हा असा नैसर्गिक स्क्रब आहे, जो त्वचेचं कोणतंही नुकसान न करता स्वच्छ, मुलायम आणि ग्लोइंग बनवतो.

ओटमील स्क्रबसाठी साहित्य

२ चमचे बारीक वाटलेले ओट्स

१ चमचा दही

१ चमचा लिंबाचा रस

बनवण्याची आणि लावण्याची पद्धत

सगळ्यात तर ओट्स जरा जाडसर बारीक करा. खूप जास्तही बारीक करू नका. त्यात दही, मध आणि लिंबाचा रस घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट स्वच्छ चेहऱ्यावर लावा आणि बोटांनी हलक्या हाताने २–३ मिनिटं गोलाकार मसाज करा. नंतर १० मिनिटं तसेच राहू द्या, ज्यामुळे पोषक घटक त्वचेत चांगला मिळतील. नंतर चेहरा कोमट पाण्यानं धुवा.

ओटमील स्क्रबचे फायदे

नैसर्गिक एक्स्फोलिएशन – ओट्स मृत त्वचेच्या पेशी आणि घाण काढून त्वचा मुलायम आणि स्वच्छ बनवतात.

हायड्रेशन आणि मुलायमपणा – मध आणि दही त्वचेला मॉइस्चराइज करतात, त्यामुळे ती कोरडी वाटत नाही.

तेलकटपणा कमी होतो – लिंबाचा रस त्वचेमधील अतिरिक्त तेल कमी करतो आणि पिंपल्सपासून बचाव करतो.

नॅचरल ग्लो – नियमित वापर केल्यास त्वचेचा ग्लो वाढतो आणि चेहरा तजेलदार दिसतो.

ओटमील स्क्रब हा घरच्या घरी पार्लरसारखी मऊ आणि चमकदार त्वचा मिळवण्याचा सोपा, स्वस्त आणि प्रभावी मार्ग आहे. ह्या स्क्रबचा आठवड्यात दोनदा वापर करा, काही दिवसांतच फरक दिसायला लागेल. हा स्क्रब सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे आणि त्यात कोणतेही रासायनिक घटक नसल्यामुळे त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Homemade Oatmeal Scrub: Get Glowing, Radiant Skin Naturally and Affordably

Web Summary : Combat dull skin with a homemade oatmeal scrub! This natural exfoliator removes dead cells, moisturizes with yogurt and honey, and reduces oiliness with lemon. Use twice weekly for a radiant, healthy glow without harsh chemicals.
टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स