Lokmat Sakhi >Beauty > चेहरा उजळेल आणि डागही होतील दूर, वाचा चेहऱ्यावर रात्रभर कच्चे दूध लावून ठेवण्याचे फायदे...

चेहरा उजळेल आणि डागही होतील दूर, वाचा चेहऱ्यावर रात्रभर कच्चे दूध लावून ठेवण्याचे फायदे...

Raw Milk Benefits For Skin Care :महिला चेहऱ्यावर कच्च दूध डीप क्लीनिंग आणि स्किनवरील डाग दूर करण्यासाठी लावतात. अशात जर रात्रभर चेहऱ्यावर कच्च दूध लावून ठेवलं तर काय काय फायदे मिळतील हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 19:24 IST2025-06-06T14:42:02+5:302025-06-06T19:24:59+5:30

Raw Milk Benefits For Skin Care :महिला चेहऱ्यावर कच्च दूध डीप क्लीनिंग आणि स्किनवरील डाग दूर करण्यासाठी लावतात. अशात जर रात्रभर चेहऱ्यावर कच्च दूध लावून ठेवलं तर काय काय फायदे मिळतील हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Benefits of applying raw milk on face overnight | चेहरा उजळेल आणि डागही होतील दूर, वाचा चेहऱ्यावर रात्रभर कच्चे दूध लावून ठेवण्याचे फायदे...

चेहरा उजळेल आणि डागही होतील दूर, वाचा चेहऱ्यावर रात्रभर कच्चे दूध लावून ठेवण्याचे फायदे...

Raw Milk Benefits For Skin Care : त्वचेची काळजी घेण्यासाठी आजकाल बऱ्याच महागड्या प्रोडक्ट्सचा वापर महिला करतात. पण या प्रोडक्ट्समुळे त्वचेचं सौंदर्य काही वेळापुरतं खुलतं. सोबतच यांचे काही साइड इफेक्ट्सही दिसतात. अशात त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी आणि नॅचरल ग्लो मिळवण्यासाठी काही नॅचरल उपाय अधिक फायदेशीर ठरतात. बऱ्याच महिला चेहरा खुलवण्यासाठी चेहऱ्यावर कच्च दूध लावतात. महिला चेहऱ्यावर कच्च दूध डीप क्लीनिंग आणि स्किनवरील डाग दूर करण्यासाठी लावतात. अशात जर रात्रभर चेहऱ्यावर कच्च दूध लावून ठेवलं तर काय काय फायदे मिळतील हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

चेहरा उजळेल

कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक अॅसिड असतं. ज्यामुळे त्वचेवरील डेड स्किन सेल्सचा थर साफ होण्यास मदत मिळते. डेड स्किन निघाल्यास चेहऱ्याचं रंग अधिक खुलतो.

ड्रायनेस कमी होईल

कच्च दूध चेहऱ्यावर लावल्यानं त्वचा मॉइश्चराइज होण्यास मदत मिळते. त्वचेला भरपूर पोषण मिळतं आणि ड्रायनेस दूर होऊन त्वचा मुलायम होते.

चेहऱ्यावर येईल ग्लो

डल चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी तुम्ही रात्रभर चेहऱ्यावर कच्च दूध लावून ठेवू शकता. दुधातील प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स स्किनवर ग्लो आणण्याचं काम करतात.

डार्क स्पॉट्स कमी होतात

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी देखील कच्च दूध फायदेशीर ठरतं. दूध लावल्यानं स्किनची डीप क्लीनिंग होते आणि चेहऱ्यावर ग्लो येतो.

अॅंटी-एजिंग

कच्च दूध लावल्यानं त्वचेवर अॅंटी-एजिंग इफेक्ट्स पडतात. यानं त्वचा जास्त काळ तरूण दिसते आणि सुरकुत्याही दूर होतात.

Web Title: Benefits of applying raw milk on face overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.