पपई हे एक अतिशय गुणकारी फळ आहे हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे पपई आपण आवर्जून आणून खातो. पण पपईचा गर खाऊन त्याची सालं मात्र टाकून देतो. पण पपई आपल्या आरोग्यासाठी जेवढी उपयुक्त ठरते, तेवढेच पपईचे सालं देखील आपल्या त्वचेसाठी फायद्याचे ठरतात. चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स कमी करण्यासाठी पपईच्या सालींचा उपयोग होतो (how to apply papaya peeling on skin?). तसेच चेहऱ्यावर कमी वयात येणाऱ्या सुरकुत्या कमी करून त्वचेचा टाईटनेस टिकवून ठेवण्यासाठीही पपईची सालं मदत करतात.(use of papaya peel for reducing dark spots and pigmentation)
पपईच्या सालींचा त्वचेसाठी कसा उपयोग करायचा?
आपण जेव्हा पपई कापतो तेव्हा तिची सालंही काढून टाकतो. ही काढून घेतलेली सालं एका ठिकाणी जमा करा आणि हलकीशी धुवून घ्या.
महागड्या फळांपेक्षा कित्येक पटीने जास्त पौष्टिक आहे पेरू! 'हे' फायदे वाचाल तर रोज आठवणीने खाल..
त्यानंतर ती उन्हामध्ये २ ते ३ दिवस वाळू द्या. सालं पुर्णपणे वाळल्यानंतर ती मिक्सरमधून फिरवा आणि त्यांची अगदी बारीक पावडर तयार करा.
ही पावडर नंतर गाळणीने गाळून घ्या. आता गाळून घेतलेली जी बारीक पिठासारखी पावडर असेल ती एका वाटीमध्ये काढा. त्यामध्ये चिमूटभर हळद, कच्चं दूध आणि थोडासा मध घाला.
रेस्टॉरंटसारखी चमचमीत मटार मेथी करण्याची सोपी ट्रिक- महागडे काजू, बटर, क्रिम घालण्याचीही गरज नाही
आता सगळे पदार्थ हलवून एकजीव करा आणि नंतर हा लेप चेहऱ्याला लावा. १० ते १५ मिनिटांनी हलक्या हाताने मालिश करून चेहरा धुवून टाका. चेहऱ्यावरचं टॅनिंग, डेडस्किन निघून जाईल आणि त्वचा अगदी स्वच्छ, नितळ चमकदार होईल.
