गरमागरम वरण-भात, त्यावर पिवळ्याधमक साजूक तुपाची धार आणि जिभेवर रेंगाळणारी त्याची चव.. हे दृश्य डोळ्यासमोर आलं तरी भूक चाळवते.(ghee skincare benefits) भारतीय स्वयंपाकघरात तुपाला पदार्थाची चव वाढवणारा घटक मानलं जातं. पण हे आपल्या आरोग्यासाठी अमृतासमान आहे. जे तूप आपल्या ताटाची चव वाढवते, तेच आपल्या सौंदर्याला चार चांद देखील लावू शकते.(ayurvedic beauty tips) महागड्या पार्लरमध्ये जाऊन तासंतास बसण्यापेक्षा काही घरगुती उपाय केल्यास आपल्याला फायदो होऊ शकतो.(home remedies for glowing skin)
वाढते प्रदूषण, कामाचा ताण, अपुरी झोप आणि जंक फुडचे अतिप्रमाणात सेवन केल्यास त्वचेवर त्याचा परिणाम होऊ लागतो. त्वचा उजळवण्यासाठी आपण महागडी पार्लर ट्रिटमेंट तर करतोच पण रासायनिक घटकांमुळे आपल्या त्वचेला नुकसान देखील होते. अशावेळी घरी तयार केलेली क्रीम रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावल्यास फायदा होईल.
आयुर्वेदानुसार तूप हे त्वचेला मॉइश्चरायझ करण्याचे काम करते. तुपामध्ये ओमेगा-३, ओमेगा-९ फॅटी ॲसिड्स आणि व्हिटॅमिन A, D, E, K मुबलक प्रमाणात असतात. हे घटक त्वचेच्या खोल थरापर्यंत जाऊन पोषण देतात. बाजारात मिळणारे मॉइश्चरायझर केवळ त्वचेच्या वरच्या थरापुरते मर्यादित असतात, पण तूप त्वचेच्या पेशींना पुनरुज्जीवित करण्याचे काम करते.
नाईट क्रीम बनवण्यासाठी आपल्याला तूप, कोरफडीचा गर, नारळाचे तेल, गुलाब पाणी लागेल. यासाठी आपल्याला एका प्लेटमध्ये तूप घ्यावं लागेल. त्यात कोरफडीचा गर, नारळाचे तेल आणि गुलाब पाणी घाला. वाटीच्या मदतीने हे गोलाकारत फिरवून घ्या. तुपाचा रंग बदलेपर्यंत हे फिरवत राहा.
ही घरगुती क्रीम आपण कधी त्वचेवर लावू शकतो. आंघोळीनंतर मॉइश्चरायझरऐवजी हे क्रीम लावा किंवा रात्री झोपण्यापूर्वी ही क्रीम लावल्यास फायदा होईल. हे क्रीम लावल्याने आपल्या त्वचेला नैसर्गिक चमक मिळेल. सात दिवसांच्या नियमित वापरामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि चेहरा नैसर्गिकरित्या उजळतो. तुपातील अँटी-ऑक्सिडंट्स चेहऱ्यावरील काळे डाग आणि डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी करण्यास मदत करतात. तूप आपल्या त्वचेवरील लवचिकपणा टिकवून ठेवते, ज्यामुळे अकाली येणाऱ्या सुरकुत्या कमी होतात. ज्यांची त्वचा तेलकट किंवा सतत पिंपल्सचा त्रास होत असणाऱ्यांनी तूप लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.
