How to Use Besan and Curd on Face: बेसन आणि दह्याचा वापर प्रत्येक घरांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. बेसन आणि दही आरोग्यासोबतच, त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर ठरतं. त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी बेसन आणि दह्याचा वापर केला जातो. बेसनामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात. तर दह्यामध्ये लॅक्टिव अॅसिड असतं. जे त्वचेवरील डाग आणि पिगमेंटेशन दूर करतं. बेसन आणि दही त्वचेवर लावल्यानं सुरकुत्या, फाइन लाइन्स कमी होतात. ज्यामुळे त्वचा आणखी उजळते आणि तरूण दिसते. अशात बेसन आणि दही त्वचेवर कसं लावाल हे माहीत असणं महत्वाचं ठरतं. तेच वाचा...
बेसन आणि दह्याची पेस्ट
तुम्ही चेहऱ्यावर बेसन आणि दह्याची पेस्ट थेटही लावू शकता. यासाठी दोन चमचे बेसन घ्या आणि त्यात दही मिक्स करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटांनंतर चेहरा धुवून घ्या. बेसन आणि दह्याची ही पेस्ट त्वचेसाठी फायदेशीर ठरते. यानं त्वचेवरील डाग, चट्टे दूर होतात आणि चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.
बेसन-दही आणि हळद
तुम्ही चेहऱ्यावर बेसन आणि दहीमध्ये हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावा. यासाठी तुम्ही २ चमचे बेसन घ्या. यात एक चमचा दही आणि चिमुटभर हळद टाका. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. कोरडी झाल्यावर चेहरा पाण्यानं धुवून घ्या. हळदीमध्ये करक्यूमिन तत्व असतं, जे त्वचेवरील डाग आणि पिगमेंटेशन दूर करतं.
बेसन-दही आणि कोरफडीचा गर
बेसन आणि दह्यामध्ये कोरफडीचा गर मिक्स करूनही चेहऱ्यावर लावू शकता. कोरफडीच्या गरानं चेहरा मुलायम होतो. तसेच यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात, जे पिंपल्स आणि डाग-चट्टे दूर करण्यास मदत करतात. कोरफडीनं सुरकुत्या आणि पिगमेंटेशनही दूर होतं. हा उपाय आठवड्यातून २ ते ३ वेळा करू शकता.
बेसन-दही आणि गुलाबजल
बेसन आणि दह्यात गुलाजब मिक्स करून लावणं सुद्धा फायदेशीर ठरू शकतं. यासाठी दोन चमचे बेसन घ्या. त्यात एक चमचा दही टाका आणि गुलाबजल टाका. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि अर्ध्या तासानंतर चेहरा धुवून घ्या. यानं त्वचेवर नॅचरल ग्लो येईल. तसेच चेहऱ्याची रंगतही वाढेल.
बेसन-दही आणि तुरटी
बेसन आणि दह्यात तुम्ही तुरटी मिक्स करूनही लावू शकता. बेसन आणि दह्यात थोडं तुरटीचं पावडर मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट लावल्यानं त्वचेची रंगत वाढेल. तसेच तुरटीनं त्वचेवरील डाग, चट्टे, पिगमेंटेशन आणि सुरकुत्या दूर होतील. तसेच चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येईल.