Alum for Body Odor : तुरटीचा वापर फार पूर्वीपासून त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो. कारण यात नॅचरल अॅंटी-सेप्टीक गुण असतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, उन्हाळ्यात तुरटी शरीरासाठी किती फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात शरीराची दुर्गंधी सगळ्यांनाच नकोशी असते. ही दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. पण तुरटी कशी फायदेशीर ठरेल हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. .
कशी लावाल तुरटी?
एका वाटीमध्ये थोडं पाणी घ्या. त्यात तुरटीचा एक छोटा तुकडा टाका. हा तुकडा पूर्ण विरघळू द्या. जेव्हा तुरटी पूर्णपणे विरघळेल तेव्हा हे पाणी रूईच्या मदतीने शरीराच्या अशा अवयवांवर लावा जिथे दुर्गंधी येते. काही वेळ हे मिश्रण तसंच कोरडं होऊ द्या. नंतर थंड पाण्याने त्वचा धुवून घ्या.
काखेत लावा
दुसरा उपाय म्हणजे तुरटीचा एक तुकडा पाण्यात भिजवा आणि दुर्गंधी येणाऱ्या अवयवांवर म्हणजे काखेवर फिरवा. तुरटीचं पाणी कोरडं होऊ द्या आणि नंतर त्वचा धुवून एखादं चांगलं मॉइश्चरायजर लावू शकता.
तुरटीचं पावडर
तुरटीचं पावडर थोड्या पाण्यात टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट अशा अवयवांवर लावा जिथे दुर्गंधी येत असेल. काही वेळ ही पेस्ट तशीच राहू द्या. नंतर त्वचा धुवून घ्या.
तुरटी कशी लावाला याचे इतर फंडे
उन्हाळ्यात तुरटी काखेत लावल्यानं त्वचेला अनेक फायदे मिळतात. अशात ती कशी लावावी हे जाणून घेऊ.
- एकतर तुम्ही तुरटी पाण्यात भिजवून काखेत थेट लावू शकता. नंतर त्वचा धुवून घ्या.
- तसेच तुरटी पाण्यात भिजवून स्प्रे तयार करा. ते काखेत लावा. यानं फ्रेश वाटेल.
- तुरटीचं पावडर हलक्या गरम पाण्यात मिक्स करा. या पाण्यात कपडा भिजवून काख स्वच्छ करा.
- तुरटी आंघोळीच्या पाण्यावर फिरवूनही शरीराची दुर्गंधी दूर केली जाऊ शकते.