Join us

वाढत्या वयाची लक्षणं, पिंपल्स दूर करण्यासाठी कोरफडीच्या गरात काय मिक्स करून लावाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 13:05 IST

Aloe Vera And Coconut Oil For Face: अनेक एक्सपर्ट सुद्धा रात्री झोपण्याआधी त्वचेवर कोरफडीचा गर, मध आणि खोबऱ्याचं तेल त्वचेवर लावण्याचा सल्ला देत असतात. अशात या मिश्रणानं काय काय फायदे मिळतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

Aloe Vera And Coconut Oil For Face: त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला रोज वेगवेगळे घरगुती उपाय करत असतात. बरेचजण कोरफडीचा गर आणि खोबऱ्याचं तेल मिक्स करून चेहऱ्यावर (Skin Care) लावतात तर अनेकजण कोरफडीचा गर, मध आणि खोबऱ्याचं तेल या गोष्टी मिक्स करून त्वचेवर लावतात. अनेक एक्सपर्ट सुद्धा रात्री झोपण्याआधी त्वचेवर कोरफडीचा गर, मध आणि खोबऱ्याचं तेल त्वचेवर लावण्याचा सल्ला देत असतात. अशात या मिश्रणानं काय काय फायदे मिळतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

कोरफडीमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट गुण भरपूर असतात. सोबतच यात बीटा-कॅरोटीन, व्हिटामिन सी आणि ई भरपूर प्रमाणात सतं. ज्यामुळे त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर होतात. तसेच खोबऱ्याच्या तेलात नॅचरल मॉइश्चरायज असतं. या तेलातील व्हिटामिन ई आणि ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडमुळे त्वचा चमकदार होते. यात जर मध मिक्स करून लावलं तर त्वचेला आणखी फायदे मिळतात.

1) पिंपल्सपासून सुटका

कोरफडीच्या गरामध्ये व्हिटामिन सी, ई आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे त्वचेवरील पिंपल्स, सूज, जखम भरण्यास मदत मिळते. तर खोबऱ्याचं तेल क्लींजिंग एजंटसारखं काम करतं. या दोन्हीच्या मिश्रणानं त्वचेवरील अधिकचं तेल निघून जातं, रोमछिद्रांमधील धूळ निघून जाते. ज्यामुळे पिंपल्स कमी होतात.

2) चेहरा उजळतो

कोरफड आणि खोबऱ्याचं तेल मिक्स करून लावल्यानं चेहऱ्यावरील डाग दूर होतात. तसेच सनबर्न, टॅनिंग आणि पिगमेंटेशन कमी करण्यासही मदत मिळते. यानं त्वचेवरील काळेपणा दूर होतो. त्वचा चमकदार आणि साफ करण्याचा एक बेस्ट उपाय आहे.

3) एजिंगची लक्षणं कमी होतात

कोरफड आणि खोबऱ्याचं तेल लावल्यानं चेहऱ्याची त्वचा टाइट होते. यानं सुरकुत्या, फाइन लाइन्स आणि रोमछिद्र साफ होतात. ज्यामुळे चेहऱ्यावर दिसणारी वाढत्या वयाची लक्षणं कमी होतात आणि चेहरा आणखी तरूण दिसतो.

4) ड्राय स्किन होईल मुलायम

ड्राय स्किनमुळे चेहऱ्याची त्वचा आणि ओठ फाटू लागतात. सोबतच यामुळे अ‍ॅक्ने आणि ब्रेकआउट्सची समस्याही होते. खोबऱ्याच्या तेलामध्ये मॉइस्चरायजिंग गुण असतात, कोरफड आणि खोबऱ्याचं तेल लावल्यानं त्वचेतील ओलावा कायम राहतो. ज्यामुळे त्वचा सॉफ्ट आणि चमकदार होते.

5) त्वचा एक्सफोलिएट होते

कोरफड आणि खोबऱ्याचं तेल त्वचेवर मिक्स करून लावल्यानं त्वचेवरील मृत पेशी दूर करण्यास मदत मिळते. कोरफडीमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, जे फ्री रॅडिकल्ससोबत लढण्यास मदत करतात. हे मिश्रण त्वचेसाठी एक चांगलं एक्सफोलिएटरच्या रूपात काम करतं.

कोरफड आणि खोबऱ्याचं तेल कसं लावाल?

चेहऱ्यावर कोरफड आणि खोबऱ्याचं तेल लावणं फारच सोपं आहे. यासाठी दोन चमचे कोरफडीचा जेल घ्या आणि तेवढंच खोबऱ्याचं तेल घ्या. दोन्ही गोष्टी चांगल्या मिक्स करा. यात थोडं मध टाकलं तर अधिक चांगलं. रात्री झोपण्याआधी हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी चेहऱ्या पाण्यानं धुवून घ्या.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स