Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्यावर कोरफडीचा गर आणि गुलाबजल एकत्र लावू शकता का? पाहा काय मिळतात फायदे

चेहऱ्यावर कोरफडीचा गर आणि गुलाबजल एकत्र लावू शकता का? पाहा काय मिळतात फायदे

Aloe Vera and Rose Water for Face : अनेक लोक हे दोन्ही घटक वेगवेगळ्या प्रकारे वापरतात, पण तुम्हाला हवे असल्यास कोरफडीचा गर आणि गुलाबजल एकत्र मिसळून चेहऱ्यावर लावू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 12:02 IST2025-12-06T12:01:38+5:302025-12-06T12:02:05+5:30

Aloe Vera and Rose Water for Face : अनेक लोक हे दोन्ही घटक वेगवेगळ्या प्रकारे वापरतात, पण तुम्हाला हवे असल्यास कोरफडीचा गर आणि गुलाबजल एकत्र मिसळून चेहऱ्यावर लावू शकता.

Benefits of applying aloe vera gel and rose water on face together | चेहऱ्यावर कोरफडीचा गर आणि गुलाबजल एकत्र लावू शकता का? पाहा काय मिळतात फायदे

चेहऱ्यावर कोरफडीचा गर आणि गुलाबजल एकत्र लावू शकता का? पाहा काय मिळतात फायदे

Aloe Vera and Rose Water for Face : कोरफडीचा गर आणि गुलाबजल या दोन्ही गोष्टी त्वचेसाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. त्यामुळे बरेच लोक आपल्या स्किनकेअर रूटीनमध्ये कोरफडीचा गर आणि गुलाबजल यांचा नियमित वापर करतात. कोरफडीच्या गराने त्वचेवरील डाग-चट्टे कमी करण्यास आणि मुरुम दूर करण्यास मदत मिळते. अनेक लोक हे दोन्ही घटक वेगवेगळ्या प्रकारे वापरतात, पण तुम्हाला हवे असल्यास कोरफडीचा गर आणि गुलाबजल एकत्र मिसळून चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे त्वचा अधिक नितळ, हायड्रेटेड आणि सतेज होते. खासकरून हिवाळ्यात ही पेस्ट त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते.

कोरफडीचा गर आणि गुलाबजल एकत्र लावू शकतो का?

होय, नक्कीच! चेहऱ्यावर कोरफडीचा गर आणि गुलाबजल एकत्र लावू शकता. दोन्ही घटक मिळून त्वचेला पोषण देतात, चमक वाढवतात आणि अनेक त्वचेच्या समस्यांवर आराम देतात.

कोरफडीचा गर आणि गुलाबजल लावण्याचे फायदे

त्वचेची रंगत वाढते

हे मिश्रण त्वचेवरील मळ, टॅन आणि डाग कमी करून त्वचा अधिक ग्लोइंग बनवते.

अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा हेल्दी होते

कोरफडीच्या गरमामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचेचा टेक्स्चर सुधारतात आणि नैसर्गिक निखार वाढवतात.

त्वचा हायड्रेट होते

गुलाबजल त्वचेला शांत करतं, हायड्रेट ठेवतं आणि सॉफ्ट ग्लो देतं.

मुरुम आणि डाग कमी होतात

दोन्ही घटक अँटी-इंफ्लेमेटरी असल्याने मुरुम, लालसरपणा आणि डाग कमी करण्यात मदत करतात. त्वचेची जळजळ आणि इरिटेशन कमी होते.

कोरफडीचा गर आणि गुलाबजल कसे लावावे?

२ चमचे एलोव्हेरा जेल घ्या. १ चमचा गुलाबजल त्यात मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर समान पद्धतीने लावा. ३० मिनिटांनी साध्या पाण्याने चेहरा धुवा.

किती वेळा लावावे?

आठवड्यात २–३ वेळा लावल्यास उत्तम परिणाम दिसतात. तुम्हाला हवे असल्यास रात्री झोपण्यापूर्वी रोजही लावू शकता.

Web Title : एलोवेरा और गुलाब जल: चमकदार त्वचा के लिए फायदे!

Web Summary : एलोवेरा और गुलाब जल का मिश्रण त्वचा के लिए बहुत फायदेमंद है। यह मिश्रण त्वचा को हाइड्रेट करता है, दाग-धब्बे कम करता है और त्वचा की रंगत निखारता है। नियमित उपयोग से स्वस्थ, चमकदार त्वचा मिलती है, खासकर सर्दियों में। सर्वोत्तम परिणामों के लिए सप्ताह में 2-3 बार लगाएं।

Web Title : Aloe vera and rose water: Benefits for glowing skin revealed!

Web Summary : Aloe vera and rose water combined offer multiple skin benefits. This mixture hydrates, reduces blemishes, and enhances skin tone. Regular use promotes healthy, radiant skin, especially beneficial during winter. Apply 2-3 times weekly for optimal results.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.