lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > पिंपल्स होतील छुमंतर! सोपा उपाय, पिंपल्स घालविण्यासाठी असा करा टुथपेस्टचा वापर

पिंपल्स होतील छुमंतर! सोपा उपाय, पिंपल्स घालविण्यासाठी असा करा टुथपेस्टचा वापर

एखादा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि नेमकं त्याच दिवशी आपल्या चेहऱ्यावर टपोरा फोड दिसू लागतो. अशा वेळी हा उपाय नक्की करून बघा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:16 PM2021-09-25T16:16:01+5:302021-09-25T16:16:24+5:30

एखादा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि नेमकं त्याच दिवशी आपल्या चेहऱ्यावर टपोरा फोड दिसू लागतो. अशा वेळी हा उपाय नक्की करून बघा.

Beauty tips: A simple solution for pimples, use toothpaste to get rid of pimples | पिंपल्स होतील छुमंतर! सोपा उपाय, पिंपल्स घालविण्यासाठी असा करा टुथपेस्टचा वापर

पिंपल्स होतील छुमंतर! सोपा उपाय, पिंपल्स घालविण्यासाठी असा करा टुथपेस्टचा वापर

Highlightsटुथपेस्टचा जर अतिवापर केला तर हायपरपिगमेंटेशन, त्वचा लाल होणे, असा त्रास होऊ शकतो.

पिंपल्स म्हणजे अनेक जणींसाठी डोकेदुखी. ज्यांची त्वचा तेलकट असते, अशा महिलांना तर पिंपल्सची समस्या खूपच भेडसावते. यामध्ये एक हमखास ठरलेलं असतं. आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं असतं, काहीतरी पार्टी किंवा एखादा कार्यक्रम असतो किंवा मग आपल्यासाठी एखादा स्पेशल दिवस असल्याने आपल्याला मस्त तयार व्हायचं असतं. नेमकं असं काही असलं की त्या दिवसाच्या एक- दोन दिवस अलिकडे आपल्या चेहऱ्यावर पिंपल दिसू लागतो. दिवसागणिक अधिकच मोठा होत जातो. आता ऐनवेळी या पिंपलचं काय करावं, हे कळत नाही आणि मग आपला सगळा हिरमोड होतो. म्हणूनच एक सोपा उपाय करुन बघा.

 

पिंपल्ससाठी वापरा टुथपेस्ट
जर आपल्या चेहऱ्यावर काही महत्त्वाच्या वेळी फोड आला असेल तर हा उपाय एखाद्यावेळी करून पहावा. या उपायाचा वारंवार वापर करु नये. हा उपाय करण्यासाठी तर एखादे इयर बड घ्या. ते नसल्यास एक काडी घ्या. या काडीला स्वच्छ कापूस गुंडाळा आणि त्यावर थोडेसे टुथपेस्ट लावा. आता काडीवरचे टुथपेस्ट अलगदपणे फोडावर लावा. टुथपेस्ट फोडावरच लावले जाईल, याची काळजी घ्या. फोडाच्या आजूबाजूला शक्यतो टुथपेस्ट लागू देऊ नका. केवळ ५ मिनिटे टुथपेस्ट फोडावर राहू द्या आणि त्यानंतर लगेचच थंड पाण्याने धुवून टाका. टुथपेस्टमध्ये असणाऱ्या घटकांमुळे फोडाच्या ठिकाणी थोडी चुणचूण होऊ शकते. पण जर जास्तच जळजळ होत आहे, असे वाटले तर ५ मिनिटेही वाट बघू नका. तात्काळ चेहरा धुवून टाका.

Photo Credit: Google

पिंपल्सवर का लावावे टुथपेस्ट?
टुथपेस्टमध्ये triclosan हा घटक असतो. हा घटक बॅक्टेरियाची वाढ रोखतो आणि संसर्ग कमी करतो. याशिवाय टुथपेस्टमध्ये ग्लिसरीन, सॉरबिटॉल, कॅल्शियम कार्बोनेट, sodium lauryl sulfate (SLS) आणि बेकींग सोडा हे पदार्थ असतात. हे सगळे पदार्थ संसर्ग रोखण्यासाठी मदत करतात. त्यामुळे पिंपल्सवर टुथपेस्ट लावण्याचा सल्ला दिला जाताे. पण हा उपाय प्रत्येकवेळी करु नये. महिना- दोन महिन्यातून एखाद्या पिंपलसाठी करायला हरकत नाही, असे सौंदर्यतज्ज्ञ सांगतात.


टुथपेस्टमध्ये बेकिंग सोडा, हायड्रोजन पेरॉक्साईड यासारखे घटक असतात. त्यांचा वापर पिंपलचा आकार कमी करण्यासाठी किंवा त्यांना दाबून टाकण्यासाठी होऊ शकतो. मात्र त्यामध्ये असणाऱ्या इतर काही घटकांमुळे जळजळ होऊ शकते. त्यामुळे पिंपल्ससाठी टुथपेस्टचा वापर करताना तो अत्यंत मर्यादित हवा. 

 

जास्त वापर करणे ठरू शकते धोक्याचे
टुथपेस्टचा जर अतिवापर केला तर हायपरपिगमेंटेशन, त्वचा लाल होणे, असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हा उपाय वारंवार करु नये. काही जणी रात्री टुथपेस्ट फोडांवर लावतात आणि ती थेट सकाळी धुवून टाकतात. असे अजिबात करु नका. रात्रभर टुथपेस्ट चेहऱ्यावर ठेवणं धोकादायक आहे. ज्या टुथपेस्ट रंगबेरंगी असतात, त्यांचा वापर या उपायासाठी करु नये. पांढरट रंगाच्या टुथपेस्ट वापराव्यात. 

 

Web Title: Beauty tips: A simple solution for pimples, use toothpaste to get rid of pimples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.